शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक लवकरच- दादा भुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 04:47 IST

‘आधुनिक शेती : महाराष्ट्राचे भविष्य’ वेबिनारमध्ये दिली माहिती

नाशिक : प्रगत व लाभदायी शेतीविषयक मार्गदर्शनासाठी तीन हजार प्रयोगशील शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी लोकमत आयोजित वेबिनारमध्ये दिली.लोकमत अ‍ॅग्रोत्सव अंतर्गत बसंत अ‍ॅग्रो टेक (इं) लि. आणि सिएट स्पेशॅलिटी टायर्स यांच्या सहकार्याने ‘आधुनिक शेती : महाराष्टÑाचे भविष्य’ या विषयावर संपन्न झालेल्या वेबिनारमध्ये भुसे बोलत होते. या वेबिनारमध्ये राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे, महाराष्टÑ शेतकरी संघटनेचे संस्थापक विजय जावंधिया, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, भारतीय बीज उद्योग महासंघाचे कार्यकारी संचालक डॉ. शिवेंद्र बजाज यांच्यासह प्रायोजक कंपन्यांचे मान्यवर सहभागी झाले होते. विजय जावंधिया म्हणाले, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यास विरोध नाही; पण तंत्रज्ञानाचा वापर करून वाढविलेल्या उत्पादनाला दर मिळेल का, हा खरा प्रश्न आहे. शेतकºयांना आपल्या मालाचे मार्केटिंग करता आले पाहिजे. केवळ रडगाणं गाऊन शेतकºयांचे प्रश्न सुटत नाही, असे मत प्रदीप लोखंडे यांनी व्यक्त केले. विलास श्ािंदे यांनी, गावातून शहरात गेलेले टॅलेंट, भांडवल हे परत शेतीत कसे येईल याबाबत धोरण आखले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. शिवेंद्र बजाज यांनी विविध पिकांच्या बियाणे व घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती यावेळी दिली. या वेबिनारला बसंत अ‍ॅग्रो टेकचे अध्यक्ष अक्षय भरतीया तसेच द्राक्ष, पेरू, डाळिंब, केळी, कापूस, स्ट्रॉबेरी व संत्रा उत्पादक संघटनांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Farmerशेतकरी