शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक राज्याच्या संवैधानिक धर्तीवर लिंगायत समाजाला आरक्षण द्या- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 17:59 IST

कर्नाटक राज्याच्या संवैधानिक धर्तीवर राज्यातील लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली. नियम २८९ अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात ही मागणी केली.

मुंबई - कर्नाटक राज्याच्या संवैधानिक धर्तीवर राज्यातील लिंगायत समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली. नियम २८९ अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात ही मागणी केली. कर्नाटक राज्य सरकारने लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देत असताना मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौध्द आणि शिख समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता लिंगायत समाजाला आरक्षण दिले आहे.आज लाखो लिंगायत समाजाचे बांधव लातूर, सांगली, कोल्हापूर व यवतमाळसह राज्यात आपल्या मागण्यासाठी मोर्चे काढत आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे सरकारने समिती गठीत केली आहे. या समितीने राज्य अल्पसंख्यांक आयोगास लिंगायत समाजाच्या मागण्यांचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाने त्रिसदस्यीय समितीचा मागण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून अहवाल त्रिसदस्यीय समितीकडे सादर केला आहे.सरकारने ९ ते १४ ऑगस्ट २०१४ मध्ये कराड येथील लिंगायत आंदोलनात सत्तेत आल्यावर मागण्या लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. त्यामुळे लिंगायत समाजाच्या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.  काँग्रेस सरकारनं कर्नाटक विधानसभेत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. परंतु केंद्रातील यूपीए सरकारनं तो प्रस्ताव झिडकारला आहे.

कर्नाटक सरकारचा हा निर्णय म्हणजे हिंदूंचं धुव्रीकरण करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कर्नाटकातील राजकारण प्रभावित होऊ शकतो. लिंगायत समाजाला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठीच काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपानं केला आहे. भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा हेसुद्धा लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करतात. कर्नाटकात लिंगायत/वीरशैव समाजाची लोकसंख्या 17 टक्के आहे. काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये भाजपा हा पारंपरिक मतदार आहे. काँग्रेस दोन समाजांत फूट पाडा आणि राज करा ही रणनीती अवलंबते आहे, असा आरोप भाजपा महासचिव पी. मुरलीधर राव यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे