शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सर्व गावांत बॅलेट पेपरचा ठराव करा; शरद पवारांचे आवाहन; ईव्हीएम समर्थक-विरोधक समोरासमोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 08:55 IST

इंग्लंड-अमेरिकेत बॅलेट, मग इकडे ‘ईव्हीएम’चा हट्ट का? - शरद पवार  

लोकमत न्यूज नेटवर्कमाळशिरस (जि. सोलापूर) : अमेरिका, इंग्लंड येथील मतदान बॅलेट पेपरवर केले जाते. सगळे जग करतेय मग आमचाच हट्ट ईव्हीएमचा का? असा सवाल खासदार शरद पवार यांनी उपस्थित केला. शनिवारी खा. पवार यांनी मारकडवाडी (ता. माळशिरस) येथे भेट दिली. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले, तालुक्याच्या सगळ्या गावांचे ठराव करा. आम्हाला ईव्हीएम मतदान नको, त्या ठरावाची प्रत माझ्याकडे द्या. मुख्यमंत्री म्हणाले की, पवार यांनी हे करणे बरोबर नाही. मी काय चूक केली. या शंकेची माहिती घेऊन निरसन करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का? आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करू, तुम्ही स्वतः गावाचे म्हणणे ऐका. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर त्यांना सहकार्य करा. पोस्टल मत साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतात, यानुसार २०१९ची आकडेवारी व २०२४च्या आकडेवारीतील तफावत जयंत पाटील यांनी यावेळी लोकांसमोर मांडली. मतदानाला सरकार का घाबरते, हा शंकेचा विषय आहे, असेही ते म्हणाले.

तक्रारदारांचा आवाज दडपणे ही हुकूमशाही; पृथ्वीराज चव्हाण सातारा : पारदर्शक निवडणूक हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे; ईव्हीएमविरोधात तक्रार करणाऱ्या, बॅलेट पेपरसाठी ग्रामसभा घेणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्यांना न्यायालयाची वा पोलिस यंत्रणेची भीती दाखवणे ही  हुकूमशाही आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

अनेक गावांत बॅलेटवर निवडणूक घेण्यासाठी ठराव : पटोले मुंबई : राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. nनिवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सभागृहात व रस्त्यावर लढू, असे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

मी राजीनामा देऊ का?आमदार उत्तम जानकर म्हणाले, मारकडवाडीत मला पडलेल्या मतांचे प्रतिज्ञापत्र करून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे ठराव आयोगाकडे सादर करणार आहे. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक करण्याची हमी दिल्यास राजीनामा द्यायला मी तयार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारEVM Machineईव्हीएम मशीनmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४