शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीने झालेल्या नुकसानभरपाईसाठी ठराव, एकमताने निर्णय : जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 16:55 IST

सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हाभरात हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतक-यांना सरसकट सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याचा ठराव गुरूवारी अमरावती जिल्हा परिषदेत पारित करण्यात आला.

अमरावती : सध्या कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्हाभरात हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतक-यांना सरसकट सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याचा ठराव गुरूवारी अमरावती जिल्हा परिषदेत पारित करण्यात आला.जिल्ह्यात कपाशीचे पीक ऐन बहरात आले असताना बोंडअळीने उरल्यासुरल्या कपाशीवर आक्रमण केले. यामुळे शेतक-यांवर बहरत असलेले कपाशीचे पीक उपटण्याची वेळ आली आहे.

शेतक-यांनी यंदा खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशीतून उत्पन्नाची  समाधानकारक अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, या पिकांवर बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्हाभरात सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या नुकसानापाठोपाठ कपाशीवरील बोंडअळीने शेतक-यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. यावर्षी शेतक-यांची परिस्थिती बिकट झाली असल्यामुळे राज्य शासनाने अमरावती जिल्ह्यातील कपाशी पिकांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गौरी देशमुख, बबलू देशमुख, संजय घुलक्षे व अन्य सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभेत मांडला. तो ठराव एकमताने पारित करून शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, माजी अध्यक्ष बबलू देशमुख, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, भाजपा गटनेता प्रवीण तायडे, गौरी देशमुख, सुहासिनी ढेपे व सर्व सदस्य उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरी