शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: म्हाडाच्या ९६ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना महिन्याला भाडे मिळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:24 IST

Mhada: म्हाडाच्या ९६ अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना महिन्याला २० हजार रुपये भाडे मिळणार 

सचिन लुंगसे, मुंबई: म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील ९६ अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू/रहिवाश्यांनी त्यांच्या स्तरावर वास्तव्याची पर्यायी व्यवस्था केल्यास मंडळामार्फत दरमहा २० हजार रुपये भाडे अदा करण्याचा निर्णय 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकताच जाहीर केला आहे. तसेच बाहय यंत्रणेमार्फत तीन वर्षाकरिता १८० ते २५० चौरस फुट क्षेत्रफळाचे ४०० गाळे अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू रहिवाश्यांकरिता भाडेतत्वावर घेण्याबाबत जाहिरात देण्याचे निर्देशही मंडळास दिले आहेत.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या अतिधोकादायक इमारतींमध्ये सुमारे २४०० भाडेकरू/रहिवासी वास्तव्यास असून त्यांना तातडीने संक्रमण शिबीरात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत  मंडळाकडे फक्त ७८६ संक्रमण गाळे उपलब्ध असल्याने अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू/रहिवासी यांना तात्पुरत्या स्वरुपात संक्रमण शिबिरांतून पर्यायी निवासाची व्यवस्था देणे मंडळास शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सदर भाडेकरू/रहिवासी यांच्या जीवितास धोका पोहचू नये व त्यांची मुंबईत इतरत्र निवासाची पर्यायी व्यवस्था देणे आवश्यक असल्याने 'म्हाडा'चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी सदर निर्णय घेतला आहे. 

वरील दोन्ही प्रकारे होणारा खर्च सदर इमारतीच्या जागेवर पुनर्विकासासाठी खाजगी विकासकांना, सहकारी गृहनिर्माण संस्था यांना विकासासाठी दिल्यास सदर विकासकांना ज्या दिवसापासून मंडळामार्फत प्रति माह रू. २०,०००/- भाडे अदा करण्यात आले आहे अथवा बाहय यंत्रणेमार्फत तीन वर्षाकरिता १८० चौ. फुट ते २५० चौ. फुट क्षेत्रफळाचे ४०० गाळे भाडयाने घेतलेले आहे त्याचा देखभालीसह संपूर्ण खर्च विकासकाने व सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी भरणे बंधनकारक राहिल, असाही निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे.  

मुंबई शहर जिल्ह्यात आता प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या एकूण १३,०९१ आहे. मंडळाकडे एकूण २०,५९१ संक्रमण गाळे आहेत. उपकरप्राप्त इमारती पडणे, धोकादायक म्हणून जाहीर करणे किंवा इमारतीची संरचनात्मक दुरूस्ती अशा विविध कारणांसाठी रिकाम्या करण्यात येणाऱ्या उपकरप्राप्त इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या भाडेकरू /रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात निवासाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मंडळामार्फत शहरात व उपनगरात संक्रमण शिबिरामध्ये गाळे उपलब्ध करण्यात येतात. मोडकळीस / दुरूस्ती अंतर्गत असलेल्या उपकरप्राप्त इमारतीतील पात्र भाडेकरू, रहिवासी, अरूंद भूखंड असल्यामुळे पुनर्बांधणी न होणा-या इमारतीतील भाडेकरू, रहिवासी, रस्ते रूंदीकरणात निष्कासित झालेले रहिवाशी तसेच संक्रमण शिबीर पुनर्बांधणी अंतर्गत स्थलांतरीत करावयाचे पात्र भाडेकरू, रहिवासी यांना कायम पर्यायी व्यवस्था होईपर्यंत संक्रमण शिबीरात तात्पुरत्या स्वरूपात निवारा देण्यात येतो.

टॅग्स :mhadaम्हाडा लॉटरीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र