शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 06:07 IST

सध्या कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांची परिस्थिती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या कामाच्या तासांबाबत पुन्हा एकदा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवासी डॉक्टरांची आठवड्याची ड्युटी ४८ तासांपर्यंत मर्यादित ठेवावी, असे मत राष्ट्र्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) यापूर्वीच व्यक्त केले होते. मात्र, या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कशी व कधी करायची यावर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात आणि निवासी डॉक्टरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या निवासी डॉक्टरांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे अनेक उदाहरणांतून समोर येत आहे.

प्रथम वर्षाच्या निवासी डॉक्टरांना दिवसाला २० तासांपेक्षा अधिक वेळ रुग्णसेवा आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. आपत्कालीन सेवा, ओपीडी, वॉर्ड राउंड, तसेच शैक्षणिक कामे या सर्वांचा ताण एकाच वेळी सांभाळताना त्यांच्यावर प्रचंड कामाचा बोजा येत आहे. या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टर संघटनांकडून वारंवार ४८ तासांच्या मर्यादेची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या मते, अधिकच्या कामामुळे डॉक्टरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून, त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेच्या गुणवत्तेवरही होऊ शकतो.

वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकारी काय म्हणतात?

वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रुग्णसंख्या, डॉक्टरांची कमतरता व उपलब्ध संसाधने लक्षात घेता ४८ तासांची मर्यादा तातडीने लागू करणे आव्हानात्मक आहे. महाविद्यालयांमध्ये मनुष्यबळ अपुरे असल्याने निवासी डॉक्टरांवर अतिरिक्त ताण येतो. मात्र याबाबत लवकरच धोरण ठरवून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी कशा पद्धतने करता येईल हे पाहणार आहे. यासंदर्भात निवासी डॉक्टर आणि रुग्णालयांच्या अधिष्ठातांसोबत बैठक घेऊन सुवर्णमध्य काढण्यात येणार आहे.

क्लिनिकल विभागातील डॉक्टर एकाच वेळी २० ते ३६ तास सलग काम करत असल्याने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. डॉक्टरांचे आठवड्याचे ४८ कामांचे तास निश्चितीबद्दल यापूर्वीच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत, त्याची राज्याने केवळ अंमलबजावणी करायची आहे.-डॉ. सुयश धवणे, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना

English
हिंदी सारांश
Web Title : Resident doctors' 48-hour work week in Maharashtra? Confusion prevails.

Web Summary : Maharashtra resident doctors face uncertainty regarding 48-hour work limits recommended by the NMC. Current conditions force grueling hours, impacting well-being and patient care. Implementation challenges exist due to staffing shortages. The medical education department plans discussions for phased implementation.
टॅग्स :doctorडॉक्टर