मुंबई : महाराष्ट्र सीनियर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने आधार-लिंक बायोमेट्रिक प्रणालीतील त्रुटींविषयी गंभीर चिंता व्यक्त केली. या अडचणींमुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना ‘ड्युटी लॉग’ करता येत नाही. परिणामी, डॉक्टर कामावर असतानाही कागदोपत्री ‘अनुपस्थित’ दाखवले जात आहेत.
प्रत्यक्ष ड्युटी करूनही उपस्थिती नोंदली जात नसल्याने त्यांच्या पगारातून पैसे कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जीटी रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले, ही समस्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे. विभागप्रमुखांनी प्रमाणित केलेली उपस्थिती विचारात घेणे यासाठी संबंधित रुग्णालय प्रशासनावर अवलंबून राहावे लागते.
नेमक्या त्रुटी काय?महाराष्ट्र सीनियर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे यांनी सांगितले, ही प्रणाली अनेकवेळा चेहरा ओळखण्यात किंवा आधार नोंदींशी जुळवण्यात अपयशी ठरत आहे. अनेक डॉक्टरांनी या समस्येबाबत त्यांच्या विभागप्रमुख वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडे तक्रारी केल्या आहेत.
आम्ही ड्युटीवर होतो हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे फारसे पर्याय नाहीत. हा त्रास काही वैद्यकीय महाविद्यालयात होत आहे. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. केवळ जीटी रुग्णालयातच काही वरिष्ठ निवासी डॉक्टरांना याचा त्रास झाला आहे. तसेच काही अन्य रुग्णालयांतही ही समस्या आहे. या समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून विभागप्रमुखांकडून प्रमाणपत्रे दिली जात असली तरी, रुग्णालय प्रशासन अनेकवेळा बायोमेट्रिक उपस्थितीवरच ठाम राहते. त्यामुळे त्यात तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Web Summary : Maharashtra's resident doctors face biometric attendance issues, marking them 'absent' despite working. Faulty systems fail to recognize faces, impacting duty logs and potentially salaries. Doctors are seeking solutions with hospital administrations for resolution.
Web Summary : महाराष्ट्र के निवासी डॉक्टर बायोमेट्रिक उपस्थिति की समस्याओं का सामना कर रहे हैं, जिससे काम करने के बावजूद उन्हें 'अनुपस्थित' चिह्नित किया जा रहा है। दोषपूर्ण सिस्टम चेहरे पहचानने में विफल हैं, जिससे ड्यूटी लॉग और संभावित वेतन प्रभावित हो रहे हैं। डॉक्टर समाधान के लिए अस्पताल प्रशासन के साथ समाधान ढूंढ रहे हैं।