शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर तीन महिने पगाराविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 06:20 IST

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला निवेदन 

शासकीय रुग्णालयात दिवसरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे अनेक डॉक्टरांना शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा ईएमआय भरता येत नाही. निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने डॉक्टरांची ही व्यथा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर याच्याकडे मांडली आहे.

सेंट्रल मार्डच्या प्रतिनिधींनी निवासी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांबाबत डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेदरम्यान मार्डने सरकारकडे प्रलंबित असलेल्या  प्रलंबित मागण्यांकडेही लक्ष वेधले आहे. डॉक्टरांच्या संरक्षणाचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले. या वेळी डॉ. धनराज गिते, डॉ. संगमेश्वर महाजन व इतर सहकारी उपस्थित होते.

याशिवाय शासकीय आणि पालिका रुग्णालयांचे विश्लेषण करण्याची मागणीही डॉक्टरांनी केली आहे. याशिवाय, वरिष्ठ डॉक्टरांची संख्या वाढवण्याचा आग्रह निवासी डॉक्टरांनी धरला आहे. जेणेकरून शासनाच्या डॉक्टरांचे बाँड धोरण अधिक बळकट करता येईल, असेही मत डॉक्टरांनी या वेळी मांडले.

औषधांचा तुटवडा कायमसरकारी रुग्णालयामध्ये अजूनही औषधींचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगावे लागत असल्याने अनेक वेळा रुग्णांचे नातेवाईक व रहिवाशांमध्ये बाचाबाची होते. डॉक्टरांच्या वसतिगृहांचा प्रश्न अजूनही कायम असून, वसतिगृहांच्या घराची अवस्था दयनीय झाली आहे. तसेच जे. जे. रुग्णालयात १५०० रहिवाशांसाठी वसतिगृह बांधण्याची मागणी अनेक वेळा शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, या सर्व बाबींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे दहिफळे यानी सांगितले.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टर