शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

बसचे आसन आरक्षित केले; पण..

By प्रगती पाटील | Updated: January 21, 2025 08:52 IST

Bus Reservation: आपण आसन आरक्षण केलेले असल्याने ते रिकामे असणार आहे का? त्यावर कोणालाच बसू देणार नसतील तर ठीक आहे, पण अगोदरच बसून आलेला प्रवासी न उठला तर काय करावे?  

- प्रगती जाधव-पाटील (उपसंपादक, लोकमत, सातारा)लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसटी आरक्षण केले असताना मधूनच प्रवास करावा लागला तर काय करावे? - शुभांगी गव्हाणे, सातारा नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी अनेकदा मोठ्या शहरात जावे लागते. लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास ऐनवेळी जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवास आरामदायी होत नाही. साहजिकच चिडचिड होते. मानसिक, शारीरिक त्रास होतो तो वेगळाच. असे अनुभव पुन्हा येऊ नये म्हणून अनेक नोकरदार, व्यापारी एसटीचे आगाऊ आरक्षण करत असतात. आपला शारीरिक, मानसिक त्रास कमी व्हावा हाच हेतू त्यामागे असतो. अशा लांब पल्ल्यासाठी नियोजित दिवसाचे आरक्षण केलेले असते. पण अचानक काही कारणाने आपल्याला आदल्या दिवशी पुढील गावात जावे लागले तर तेथील काम आटोपून आपण आपली नियोजित गाडी पकडून पुढील प्रवासाला जाऊ या, असे काहींना वाटणे साहजिकच आहे. पण त्याचवेळी एक प्रश्न सतावतो, आपण आसन आरक्षण केलेले असल्याने ते रिकामे असणार आहे का? त्यावर कोणालाच बसू देणार नसतील तर ठीक आहे, पण अगोदरच बसून आलेला प्रवासी न उठला तर काय करावे?  याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या साताऱ्याच्या विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड म्हणाल्या, ‘एसटीच्या कोणत्याही गाडीचे आरक्षण केलेले असल्यास ते प्रवास सुरू होईपर्यंतच लागू असते. एसटी बसस्थानकातून पुढील प्रवासाला निघेपर्यंत संबंधित प्रवासी न आल्यास आरक्षण आपोआप रद्द होते. त्यामुळे निम्म्यातून प्रवास करण्याचा प्रश्नच येत नाही. अशावेळी किमान एक तास अगोदर हे आरक्षण रद्द करावे. त्या बदल्यात तिकिटाची ठरावीक रक्कम मिळेल. त्यानंतर नवीन आरक्षण करावे. ( सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)

टॅग्स :state transportएसटी