शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

घटनादुरुस्ती केली, तरच मराठ्यांना आरक्षण; प्रकाश आंबेडकर यांनी वेधले कायदेशीर बाबींकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 08:50 IST

मुंबईतील आजच्या चर्चेनंतर ठरणार आंदोलनाची पुढील दिशा. मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका; पण केंद्र सरकारने केलेली १०२ वी घटना दुरुस्ती अडसर ठरत आहे. कायदेशीर सवलतीसह आरक्षण हवे असल्यास घटना दुरुस्ती करण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे लागेल, अशी सूचना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

मराठा आरक्षण लढ्याचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचे रणशिंग बुधवारी कोल्हापुरातून फुंकले गेले. या आंदोलनात  संभाजीराजे यांच्यासमवेत आंबेडकरदेखील मांडीला मांडी लावून सहभागी झाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच आल्याने ते काय बोलतात, याचीच उत्सुकता जास्त होती; पण त्यांनी जाहीर भाषण टाळत केवळ पाठिंबा दर्शवत शांत राहणेच पसंद केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी काही काळ संवाद साधला असता, आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींवर बोट ठेवले.

सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी  राज्य सरकारने गुरुवारी आवताण दिले आहे, त्यांच्या या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे खा. संभाजीराजे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदींसमवेत चर्चा करण्यासाठी मराठा समाजातील अभ्यासू समन्वयक, तज्ज्ञांना सोबत घेऊन आम्ही तयारी करून जाणार आहोत. कोल्हापूरनंतर आता नाशिकमध्ये २१ जूनला मूक आंदोलन करण्याचे नियोजन आहे. त्यापूर्वी आजच्या चर्चेत आम्ही मांडलेल्या मागण्यांची पूर्तता सरकारकडून झाल्यास नाशिकमध्ये आंदोलनाऐवजी विजयोत्सव साजरा करण्यात येईल, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

आजारी असतानाही धैर्यशील माने आंदोलनातआजारी असतानाही सलाइनच्या पिनसह आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार धैर्यशील माने यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. कोरोनातून बरे झाल्यानंतर इन्फेक्शन झाल्याने सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

मी माझी भूमिका पुण्यात मांडेन - चंद्रकांत पाटीलn गेले पाच दिवस एकमेकांवर टोलेबाजी करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मूक आंदोलनाच्या निमित्ताने बुधवारी सकाळी समोरासमोर आले. शाहू महाराजांच्या समाधिस्थळी आल्याआल्या पाटील यांनी संभाजीराजे यांना आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले. n यावेळी पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका मांडायची आहे ती मी पुण्याचा लोकप्रतिनिधी असल्याने पुण्यात मांडणार आहे. या ठिकाणी मी मराठा समाजातील एक नागरिक म्हणून आलो आहे. 

लाँगमार्च काढावा लागू नयेया चर्चेतून काही साध्य झाले नाही, तर आम्ही यापूर्वी जाहीर केल्यानुसार पुणे ते मुंबई असा लाँगमार्च काढला जाईल. हा लाँगमार्च आम्हाला काढावा लागू नये, याची दक्षता घेऊन सरकारने निर्णय घ्यावा.     - खासदार संभाजीराजे 

राज्यभरातून सहभागराजेंद्र कोंढरे (पुणे), करण गायकर, गणेश कदम (नाशिक), अंकुश कदम (नवी मुंबई), विनोद साबळे (रायगड), रघुनाथ चित्रे पाटील, धनंजय जाधव (पुणे), रमेश केरे, अप्पासाहेब कुडेकर (औरंगाबाद), महेश गवळी, सज्जनराव साळुंके, जीवनराजे इंगळे (उस्मानाबाद), नीलेश देशमुख (बुलडाणा), महादेव देवसरकर (नांदेड), गंगाधर काळकुटे, पूजा मोरे (बीड), वीरेंद्र पवार (मुंबई), माऊली पवार (सोलापूर), रमेश आंब्रे, प्रवीण पिसाळ (ठाणे), व्यंकट शिंदे (लातूर), ॲड. सुहास सावंत (सिंधुदुर्ग), संजय पाटील, नितीन शिंदे (सांगली), विवेकानंद बाबर, रफिक शेख (सातारा) आदी समन्वयक सहभागी झाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर