शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कायदे बदलून मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल - शाहू छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 20:05 IST

मराठ्यांच्या प्रगतीचे, सर्वांगीण विकासाचे मार्ग खुंटले आहेत. शासकीय नोकऱ्यांत, शिक्षण क्षेत्रात, उद्योग व्यवसायांत, शेतीमध्ये मराठा समाज अडचणीत आला आहे. या सर्वाला केवळ शासकीय धोरणे जबाबदार आहेत.

ठळक मुद्देराज्यकर्ते आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, ही भूमिका घेऊन आज मराठे लढत आहेत. कायदे बदलून आरक्षण द्यावेच लागेल. तोपर्यंत मराठा समाजाचा राग शांत हाणार नाही.भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजवर प्रत्येक राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरुन चालण्याची भूमिका बजावली आहे.

कोल्हापूर, दि. 8 - मराठ्यांच्या प्रगतीचे, सर्वांगीण विकासाचे मार्ग खुंटले आहेत. शासकीय नोकऱ्यांत, शिक्षण क्षेत्रात, उद्योग व्यवसायांत, शेतीमध्ये मराठा समाज अडचणीत आला आहे. या सर्वाला केवळ शासकीय धोरणे जबाबदार आहेत. आमच्या प्रगतीचे मार्ग तुम्ही बंद केलेत, आमचं काय चुकलंय? याचा जाब मराठा समाज संघटितपणे विचारतोय, असे कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज म्हणाले. उद्या मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा निघत आहे. यामध्ये 25 लाख जण सामिल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकराला खडे बोल सुनावले आहेत. आजवर राज्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या उन्नतीकरिता जेवढे लक्ष द्यायला हवं होतं, तेवढं दिलं नाही. आता मराठा समाजाला गृहीत धरण्याचे दिवस आता संपले आहेत. राज्यकर्ते आपल्यासाठी काही करीत नाहीत, आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, ही भूमिका घेऊन आज मराठे लढत आहेत. पाणी गळ्यापर्यंत आले आहे. यापुढे मराठा समाज सहन करण्याच्या स्थितीत नाही. कायदे बदलून आरक्षण द्यावेच लागेल. तोपर्यंत मराठा समाजाचा राग शांत हाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाररात्मक भूमिकेतून संपूर्ण भारतात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे शाहू छत्रपती महाराज म्हणाले. भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आजवर प्रत्येक राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरुन चालण्याची भूमिका बजावली आहे. सर्वच क्षेत्रात होत असलेल्या पिछेहाटीमुळे समाजबांधव अस्वस्थ झाला आहे. समाजाचा हा आक्रोश रास्तच आहे. लोकसंखेच्या प्रमाणानुसार नोकरी आणि शिक्षण क्षेत्रातील आरक्षण देण्यासह मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाचे व्यापक धोरण सरकारनं ठरवावं. त्याकरिता प्रसंगी कायदे दुरुस्त करण्याची अथाव बदल करण्याची आवश्यकता आहे. केंद्रात आणि राज्यात आता तुमचेच सरकार आहे. घोषणा करुन, वटहुकूम काढून चालणार नाही. त्यासाठी कायद्यातच बदल करायला हवा. यासाठी विधिमंडळ, संसदेत एकत्रित बसून कायदा तयार करा, असे शाहू छत्रपती महाराजांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा