शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-राष्ट्रवादीत मोठी नाराजी; राज्यभरात नेते-कार्यकर्त्यांमध्ये बेबनाव उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 07:56 IST

शिवसेना-राष्ट्रवादीत राज्यभर तणातणी; ठाण्यात शिंदे विरुद्ध आव्हाड; रायगडमध्ये तटकरे विरुद्ध शिवसेना, बोदवड नगरपालिकेत खडसेंना दूर ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप एकत्र

यदु जोशीमुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संबंध अधिक दृढ असल्याचे आणि हे दोन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार असल्याचे चित्र असताना, प्रत्यक्षात मात्र दोन पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांमध्ये विविध ठिकाणी बेबनाव असल्याचे दिसत आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार असले तरी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये अधिक जवळीक बघायला मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्लामसलतीतून सरकारचे निर्णय होतात असेही अनेकदा बोलले गेले. अलीकडे झालेल्या नगरपालिका निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी दोन पक्षांची आघाडी होती. काँग्रेस मात्र स्वबळावर लढली होती. असे असले तरी दोन्ही पक्षांमध्ये जिल्ह्याजिल्ह्यांत खटके उडत असल्याचे दिसत आहे.

विशेषत: राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आमच्या जिल्ह्यातील नेत्यांना बळ देतात, त्या माध्यमातून शिवसेनेला दाबण्याचे काम केले जाते, असे राज्यातील किमान अर्धा डझन जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे गाऱ्हाणे आहे. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी ट्विट करून बीड जिल्ह्यातील नगरपंचायत अध्यक्षपद निवडणुकीवरून शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. राष्ट्रवादीला हरविण्यासाठी शिवसेनेचे नेते भाजपची मदत घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेला ९, राष्ट्रवादीला ७ आणि भाजपला एक जागा मिळाली होती. तिथे शुक्रवारी  नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेने भाजप नगरसेवकांची मदत घेतली.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आमदार चंद्रकांत पाटील व आमदार गिरीश महाजन यांनी शह दिला आणि राष्ट्रवादीच्या चमत्काराच्या दाव्यातील हवा काढली. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. लंके यांनी बाजी मारली. अहमदनगर शहरातही महापालिकेतील सत्तारूढ शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप असा सुप्त संघर्ष बघायला मिळतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अकोला विधान परिषद मतदारसंघ निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना राष्ट्रवादीने साथ दिली नाही, अशी तक्रार होती.

ठाणे महापालिका निवडणूक लवकरच होऊ घातली असताना नगरविकास मंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रायगड जिल्ह्यात खासदार सुनील तटकरे, त्यांच्या कन्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याविरुद्ध शिवसेना एकवटली आहे. आदिती यांना पालकमंत्री पदावरून हटविण्याची मागणी शिवसेनेकडून जोर धरत आहे. 

दोन भावांमध्ये कधी-कधी वाद होतात तसे राष्ट्रवादी-शिवसेनेचे कुठे थोडे-बहुत रुसवेफुगवे होत असतात. त्यात गंभीर असे काहीही नाही. घरातील वाद आहेत, घरातच मिटतील. चिंता करण्यासारखे काहीही नाही. - नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस