शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

‘२६/११’तील जाँबाज अधिकाऱ्यांचा गौरव

By admin | Updated: August 26, 2015 02:18 IST

‘२६/११’चा हल्ला झाल्यावर त्या वेळी अतिरेक्यांचा प्रतिकार करणाऱ्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ५० जणांना त्यांच्या कर्तबगारीसाठी मंगळवारी राजभवनात सन्मानित करण्यात आले

मुंबई : ‘२६/११’चा हल्ला झाल्यावर त्या वेळी अतिरेक्यांचा प्रतिकार करणाऱ्या आठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ५० जणांना त्यांच्या कर्तबगारीसाठी मंगळवारी राजभवनात सन्मानित करण्यात आले. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक व पोलीस शौर्यपदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृह विभागाच्यावतीने राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ आॅगस्ट २०१३ रोजी पदक जाहीर झाले होते. त्याचे वितरण करण्यात आले.२६ नोव्हेंबर २००८ रोजी ताज हॉटेलमध्ये शिरलेल्या अतिरेक्यांशी मुकाबला करणारे परिमंडळ -१ चे उपायुक्त आणि सध्या औरंगाबाद येथे विशेष पोलिस निरीक्षक असलेले विश्वास नांगरे-पाटील ,राजवर्धन (सहआयुक्त, नागपूर), दीपक ढोले (साहाय्यक आयुक्त, पाचपावली, नागपूर), साहाय्यक निरीक्षक नितीन काकडे, हवालदार अरुण माने, सौदागर शिंदे, अमित खेतले व पवार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक प्रदान करण्यात आले. त्यांच्यासह ५० जणांचा गौरव करण्यात आले. परदेशी सुकोजी देवांगण, पोलीस हवालदार गडचिरोली (मरणोत्तर), गोविंद बाली फरकाडे, पोलीस नाईक गडचिरोली (मरणोत्तर) व मुन्शी चिक्कू पुंगाटी, पोलीस शिपाई गडचिरोली (मरणोत्तर) यांना जाहीर झालेले पोलीस शौर्यपदक त्यांच्या नातलगांनी स्वीकारले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री सर्वश्री डा़ॅ़ रणजीत देशमुख (शहर) व राम शिंदे (ग्रामीण), अपर मुख्य सचिव (गृह) के़ पी़ बक्षी, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, पोलीस आयुक्त राकेश मारीया उपस्थित होते. समारंभाला इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी तसेच गौरविण्यात येणाऱ्या पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते. (प्रतिनिधी)२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धाडसी कामगिरी बजावलेल्या ५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज भवनातील दरबार हॉल येथे आयोजित समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.