शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बे हायकोर्टचे नामांतर महाराष्ट्र हायकोर्ट करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 05:08 IST

सुप्रीम कोर्टाने दिली नोटीस : विजय पाटील यांची जनहित याचिकेत मागणी

शीलेश शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘बॉम्बे हायकोर्ट हे नाव बदलून त्याऐवजी ‘महाराष्ट्र हायकोर्ट’असे करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या सार्वजनिक हिताच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार आणि इतरांना नोटीस जारी केली. ही याचिका कामगार न्यायालयाचे न्यायाधीश (सेवानिवृत्त) विजय पी. पाटील यांनी दाखल केली.‘केंद्र सरकार आणि इतर प्रतिवादींना नोटीस द्या. आम्ही त्यांच्याकडून या विषयावर सविस्तर म्हणणे मागत आहोत,’ असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले.पाटील यांनी आपल्या याचिकेत महाराष्ट्रातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे म्हटले. ‘महाराष्ट्र’ या शब्दाला महाराष्ट्रीयांच्या जीवनात विशेष स्थान आहे. त्यामुळे तो शब्द उच्च न्यायालयाच्या नावातूनही व्यक्त झालाच पाहिजे, असे याचिकेत म्हटले आहे.संबंधित पक्षांकडून त्यांचे सविस्तर म्हणणे आल्यानंतर या विषयावर पुढील सुनावणी घेतली जाईल, असेही खंडपीठाने म्हटले.१९६० मध्ये गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये स्वतंत्र झाली. तेव्हा सरकारने दिलेल्या आदेशात म्हटले होते की, राज्याचे राज्यपाल (गव्हर्नर आॅफ महाराष्टÑ), उच्च न्यायालय हाय कोर्ट आॅफ महाराष्ट्र या नावाने ओळखण्याची व्यवस्था होती; परंतु महाराष्ट्र उच्च न्यायालयाला ‘बॉम्बे बे हायकोर्ट’ असे नाव दिले गेले व तीच त्याची ओळख बनली. ती १९६० च्या आदेशाविरुद्ध आहे, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकेत युक्तिवाद करण्यात आला आहे की, याचिकाकर्त्याला देशाच्या घटनेतील अनुच्छेद १४, १९, २१ आणि २९ मध्ये जे अधिकार प्राप्त आहेत. त्याअंतर्गत अनुच्छेद ३२ चा वापर करून बॉम्बे हायकोर्टचे नाव हायकोर्ट आॅफ महाराष्ट्र असे बदलून घेण्याची मागणी करीत आहे.सर्वोच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील शिवाजी एम. जाधव यांनी पाटील यांच्या वतीने ही जनहित याचिका दाखल करताना सगळे दस्तावेजी पुरावेही सादर केले. त्यातून हे सिद्ध होते की, ‘बॉम्बे हायकोर्ट’ला ‘हायकोर्ट आॅफ महाराष्ट्र’ नाव दिले जाणे न्यायसंगत आहे. या याचिकेत केंद्रीय गृहमंत्रालय, कायदा मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि गोवा सरकारलाही प्रतिवादी बनविण्यात आले आहे.