शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रिंगण सोहळा ठरला आकर्षण

By admin | Updated: June 15, 2017 20:25 IST

नर्सी नामदेव येथून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखीचे हिंगोलीनगरीत स्वागत मोठ्या उत्साहात केले

ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 15 - तालुक्यातील नर्सी नामदेव येथून निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखीचे हिंगोलीनगरीत स्वागत मोठ्या उत्साहात केले. टाळ, मृदंगाच्या निनादात पालखी मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असताना मंगलमयी वातावरणाने परिसर भारला होता. तर पालखीचा रिंगण सोहळा हिंगोलीकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे काल प्रस्थान झाल्यानंतर आज १५ जून रोजी ही पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाली. संत नामदेवांच्या जन्मस्थळापासून निघालेल्या पालखीचे पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी एकूण २२ टप्पे होतात. यातील पहिला टप्पा हा हिंगोली येथे आहे. हिंगोलीनगरीत दुपारी ३.४५ वाजता पालखी दाखल झाली होती. नागरिकांच्या वतीने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी पूजा करून पालखीचे दर्शन घेतले. विविध मान्यवरांनीही पालखीच्या स्वागतासाठी हजेरी लावत दर्शन घेतले. हाती भगवी पताका घेवून अगदी शिस्तीत जाणारे वारकरी, टाळ -मृदंगाचा गजर यामुळे भक्तीमय वातावरण झाले होते. त्यानंतर रामलीला मैदानावर पालखी पोहोचली. तेथे वारकऱ्यांनी भजने गात सर्वांचीच मने जिंकली. तर रिंगणामध्ये मानाचा असलेला संत नामदेव महाराज यांचा अश्व धावल्यानंतर इतर अश्व धावले. तर घोडेस्वारांनी यावेळी विविध कवायती सादर केल्या. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या कवायती टिपण्यासाठी अनेकांचे कॅमेरे सरसावले होते. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर,मुख्याधिकारी रामदास पाटील, नगरसेवक गणेश बांगर, अशोक नाईक, अनिता सूर्यतळ, बिरजू यादव, गोपाल अग्रवाल, नाना नायक, दिनेश चौधरी, चांदु लांडगे, सभापती रामेश्वर शिंदे, जि.प.सदस्य विठ्ठल चौतमल आदी मान्यवर उपस्थित होते. यासाठी न.प. कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.एकंदरीत ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने हिंगोलीनगरी दुमदुमली होती. पालखीचे स्वागत करण्यासाठी विविध राजकारणी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. या संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळी मंदिराचे बांधकाम सुरु असल्याने बांधकामासाठी मदत करण्याचेही आवाहनही या ठिकाणी केले जात होते. रिंगण सोहळा संपल्यानंतर हभप अच्यूत महाराज यांचे कीर्तन झाले. पहिला टप्पा : २२ वर्षांची परंपरा कायम संत नामदेव महाराज यांच्या पालखीची तब्बल २२ वर्षांची परंपरा असून, या पालखीत सहभागी झालेले वयोवृद्धही तरुणाला लाजवेल अशा कसरती सादर करीत होते. हिंगोलीत आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते रिंगण सोहळ्याचे ध्वजारोहण झाले. नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी पत्नी निता यांच्यासह संत नामदेवांच्या पादुकांचे पूजन केले. त्यानंतर वारकऱ्यांचे रुमाल, टोपी व हार घालून स्वागत करण्यात आले. तर रिंगण सोहळा आटोपल्यानंतर त्यात सहभागी झालेल्या अश्वधारकांना पारितोषिक वितरणही करण्यात आले. भाविक उपस्थित पालखीचा हा आगळा-वेगळा सोहळा पाहण्यासाठी ग्रामीण भागातील वयोवृद्ध मंडळी दाखल झाली होती. पालखीतील वारकारी संप्रदायांची व येथे येणाऱ्या भाविकांची नागरिकांच्या वतीने व्यवस्था केली होती.