शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशांवरील मराठ्यांच्या विजयाचा आज स्मरणदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 01:27 IST

वडगावात १७७९ मध्ये झालेल्या लढाईत महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्यांनी इंग्रजांवर निर्णायक विजय मिळवला

वडगाव मावळ : वडगावात १७७९ मध्ये झालेल्या लढाईत महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्यांनी इंग्रजांवर निर्णायक विजय मिळवला होता. फिरंग्यावरील या विजयाचे स्मरण म्हणून दर वर्षी १६ जानेवारीला येथे विविध कार्यक्रमांनी विजय दिन उत्साहात साजरा केला जातो.येथे २००३ मध्ये ग्रामस्थांनी या लढाईतील सरशीची स्मृती म्हणून विजयस्तंभ उभारला आहे. ग्रामपंचायतीने स्मारकासाठी जागा उपलब्ध केली आहे. या प्रकल्पाला मावळ तालुका प्राथमिक शिक्षक गृहरचना संस्था आणि श्रीमंत महादजी शिंदे प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले आहे. १७७९ च्या मकरसंक्रांतीच्या दिवशी श्रीमंत महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी महासत्तेच्या फौजेने इस्ट इंडिया कंपनीच्या आक्रमक फौजेचा दणदणीत पराभव केला. परकियांविरुद्ध भारतीयांनी जे काही विजय मिळवले, त्यातला वडगावचा वैभवशाली विजय ठळक आहे. त्यामुळे सव्वादोनशे वर्षांनी एक्सप्रेस नागरिक वडगाव विजयस्तंभ प्रतिष्ठानाने अभिमानाने विजयस्तंभ आणि श्रीमंत महादजी शिंदे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. (वार्ताहर)>श्रीमंत महादजींनी या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आगळ्या युद्धतंत्राचा अवलंब केला. पुणे ताब्यात घेण्यासाठी इंग्रजी फौजांनी मुंबईहून कुच केले. खंडाळा ते पुण्याच्या दरम्यानची सगळी गावे आधीच रिकामी केली होती. धान्य आणि चारा हलवला होता. सगळे जलसाठे विषारी करून टाकले होते. अन्न-पाण्याविना शत्रूचे सैन्य ठेचकाळत पुढे निघाले तेव्हा मराठा घोडदळाने त्याला रात्रंदिवस त्रस्त केले. साधी झोपदेखील मिळू दिली नाही.