शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिला की सरकार आठवते, अजित पवार...; राज ठाकरे बोलून गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 21:19 IST

राज यांनी वडापाव महोत्सवात येऊन वडापाव खाणे टाळले. याचे त्यांनी कारणही सांगितले. यामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वडापाव महोत्सवाला आले होते. यावेळी त्यांनी वडापाव पाहिला की गेल्या वर्षभरापासून सरकारची आठवण येते, असा टोला राज यांनी लगावला. तसेच राज यांनी वडापाव महोत्सवात येऊन वडापाव खाणे टाळले. याचे त्यांनी कारणही सांगितले. यामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला होता. 

फडणवीस आणि शिंदेंमधला वडा अजित पवार आहेत की अजित पवार आणि फडणवीसांमधला वडा शिंदे आहेत की त्या दोघांमधला वडा फडणवीस आहेत, हेच गेली वर्षभर कळत नाहीय, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज यांनी किर्ती कॉलेज, शिवाजी पार्क इथला वडापाव खाऊनच मी मोठा झाल्याचे सांगितले. यावेळी राज यांनी सचिनच्या वडापाव प्रेमाचा देखील किस्सा सांगितला. 

वडापाव ही संकल्पना अशोक वैद्य आणली. त्यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करावा अशी मागणी राज यांनी केली. अशोकरावांचे आभार की त्यांनी कित्येक पिढ्या घडवल्या आणि गाड्या उभ्या करण्याची संधी दिली, असे राज म्हणाले. 

मी वडापाव खाऊ शकत नाही...महोत्सवात एवढे स्टॉल लागलेत. परंतू, खूप इच्छा असूनसुद्धा इथे मला वडापाव खाता येणार नाही. परंतू, खरोखरच मला वडापाव खायचा आहे, असेही राज म्हणाले. मीडियाच्या कॅमेरांकडे बोट दाखवून हे काही मला सोडत नाहीत, दुसऱ्या दिवशी ऑSSS सारखे वेडेवाकडे फोटो येतात. त्यामुळे मी यांना पार्सल द्यायला सांगितलेय. मी घरी जाऊन वडापाव खाईन, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस