शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रोसिटीच्या खटल्यातून नारायण राणे यांना तात्पुरता दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 05:37 IST

अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती दाखल करून घेत उच्च न्यायालयाने राणे यांच्यावर खटला चालविण्यास स्थगिती दिली.

मुंबई : अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती दाखल करून घेत उच्च न्यायालयाने राणे यांच्यावर खटला चालविण्यास स्थगिती दिली.उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असेपर्यंत सत्र न्यायालयाने खटला चालवू नये, असे मंगळवारी निर्देश देत न्यायालयाने नारायण राणे यांना अंतरिम दिलासा दिला. २००२ मध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांचे अपहरण केल्याचा गुन्हा नारायण राणे, बाळा नांदगावकर व भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर नोंदविला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी तिघांनीही सत्र न्यायालयात अर्ज केला. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. अमजद सय्यद व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयाने राणे यांची याचिका दाखल करून घेतली. ती उच्च न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत सत्र न्यायालयाने खटला चालवू नये, असे निर्देशही खंडपीठाने सत्र न्यायालयाला दिले. त्यामुळे राणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. २००२ मध्ये काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले. अविश्वास ठरावही मांडला. काँग्रेसने बहुमत सिद्ध करू नये, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. यादरम्यान राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांना मातोश्री स्पोर्ट्स क्लबमध्ये डांबले. सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे त्यांच्या हस्ताक्षरातील पत्र विधानसभेत सादरही केले. मात्र, विलासराव देशमुख यांना बहुमत सिद्ध करण्यात यश आले. त्यानंतर वळवी यांनी नारायण राणे, बाळा नांदगावकर व गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

टॅग्स :Courtन्यायालयNarayan Raneनारायण राणे