शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:58 IST

न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठापुढे संबंधित कर्मचाऱ्याच्या याचिकेवर सुनावणी झाली.

मुंबई : एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे कारण देत सफाई कामगाराला कायमस्वरूपी नोकरीचा लाभ नाकारणे हे उघडपणे मनमानी, भेदभावपूर्ण आणि राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ आणि १६ चे उल्लंघन आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले, तसेच मुंबईतील एका रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला नोकरीत कायमस्वरूपी करण्याचे आदेश देत त्याला मोठा दिलासा दिला. 

न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठापुढे संबंधित कर्मचाऱ्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई औद्योगिक न्यायालयाने २००६ पासून त्याला कायमस्वरूपी कर्मचारी घोषित करण्याची व २००६ ते २०१७ या कालावधीतील त्यासंबंधित लाभ देण्याची मागणी फेटाळली होती. त्या आदेशाला कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकाकर्त्याने त्याच्यासारख्या इतर कर्मचाऱ्यांना ज्या तारखेपासून कायमस्वरूपी करण्यात आले, त्या तारखेपासूनच त्यालाही ‘कायमस्वरूपी’ करण्यात यावे, असा दावा केला आहे. 

नेमके प्रकरण काय?याचिकाकर्ता १९९४ साली रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. दरम्यान, १९९९ मध्ये झालेल्या वैद्यकीय तपासणीत त्याचा अहवाल एचआयव्ही निगेटिव्ह आला.२००६ मध्ये रुग्णालयातील मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या तक्रारीनंतर काही तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात आले हाेते.  मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणी आवश्यक होती. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, याचिकाकर्त्यालाही कायमस्वरूपी करण्याचा विचार करण्यात आला होता.वैद्यकीय तपासणीत एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्याने कर्मचाऱ्याला वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे त्याची नियमित नियुक्ती करण्यात आलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : HIV-positive worker gets relief; High Court orders job to be permanent.

Web Summary : The Bombay High Court has ordered a hospital to make a 55-year-old HIV-positive sanitation worker permanent, stating denying benefits is discriminatory and violates constitutional rights.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयHIV-AIDSएड्सjobनोकरी