शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कवितेमुळे टिकतात नातेसंबंध

By admin | Updated: April 1, 2017 01:43 IST

जात-धर्म-पंथ यांच्या पलीकडे असते ती कविता. ही कविता मानवामधील नातेसंबंध टिकवून ठेवते. समाजाला कवेत घेण्याचे

चिंचवड : जात-धर्म-पंथ यांच्या पलीकडे असते ती कविता. ही कविता मानवामधील नातेसंबंध टिकवून ठेवते. समाजाला कवेत घेण्याचे सामर्थ्य कवितेमध्ये असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांनी केले. पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेच्या कला, साहित्य आणि सांस्कृतिक धोरणांतर्गत आयोजित कविसंमेलनात ते बोलत होते. या वेळी महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर उपस्थित होते. सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. ले. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी शुभेच्छा देताना काळजे म्हणाले, ‘‘या औद्योगिक नगरीत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी प्रशासनच तयार असणार आहे. पालिकेच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत स्थानिक कलाकारांना संधी दिली जाईल.’’ या वेळी कविंनी सादर केलेल्या कवितेला रसिक भरभरून दाद देत होते. काही वेळा भावनात्मक कवितेमुळे रसिकांच्या डोळ्यात अश्रू ढळत होते. उत्तरोत्तर संमेलन रंगले. स्थानिक कविंच्या सहभागामुळे कविसंमेलन बहरले. (वार्ताहर)सामाजिक कविता : टाळ्यांचा गजरकविसंमेलनाची सुरुवात ज्येष्ठ कवी प्रा. तुकाराम पाटील यांच्या ‘माझ्या सुखाच्या संसारी’ क वितेने झाली. पहिल्या कवितेलाच रसिकांनी भरभरून दाद दिली. यानंतर राज अहिरराव, सुरेश कंक, दीपेश सुराणा, अनिल दीक्षित, अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे, अरुण बोऱ्हाडे, किशोर केदारी, नितीन यादव, धनाजी कांबळे, राजेंद्र घावटे, सुहास घुमरे, भालचंद्र मगदुम, भूषण नांदुरकर, सिद्धार्थ भोसले, तुकाराम पाटील, चंद्रकांत धस, नंदकुमार कांबळे, महेंद्र गायकवाड, संगीता झिंजुर्के, शोभा जोशी, सुनील भिसे, प्रदीप गांधलीकर, रमेश वाकनीस, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, नंदकुमार मुरडे, माधुरी विधाते, धनंजय भिसे, दत्तू ठोकळे या कवींनी आपल्या कविता सादर केल्या.