शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

हटविलेले स्टॉल ग्रामस्थांनी पुन्हा उभारले, ग्रामस्थांचा उद्रेक, अचानक राबविलेल्या मोहिमेबाबत नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 20:42 IST

मुख्य धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल सोमवारी रात्री काढून टाकण्यात आले. मात्र, स्टॉलधारक आक्रमक होताच हे स्टॉल पुन्हा नाट्यमयरीत्या उभारण्यात आले. स्टॉल हटविण्याचे काम वनविभागाने केल्याची चर्चा आंबोली परिसरात असून, वनविभागाचे काही अधिकारी मुद्दामहून शांत आंबोली अशांत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. 

आंबोली - येथील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल सोमवारी रात्री काढून टाकण्यात आले. मात्र, स्टॉलधारक आक्रमक होताच हे स्टॉल पुन्हा नाट्यमयरीत्या उभारण्यात आले. स्टॉल हटविण्याचे काम वनविभागाने केल्याची चर्चा आंबोली परिसरात असून, वनविभागाचे काही अधिकारी मुद्दामहून शांत आंबोली अशांत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.  तसेच रात्री अचानक स्टॉल हटविण्याच्या कृतीबाबतही अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.आंबोलीतील मुख्य धबधब्यावर गेली कित्येक वर्षे स्थानिक ग्रामस्थांनी स्टॉल उभारले आहेत. पण या स्टॉलधारकांना चार दिवसांपूर्वी अचानक वनविभागाने नोटिसा दिल्या. तर सोमवारी रात्रीच्या सुमारास हे स्टॉल काढून टाकण्यात आले. सुरुवातीला वनविभागाने स्टॉल काढून टाकण्याचे श्रेय घेतले खरे; पण स्टॉलधारकांचा उद्रेक बघून आपण त्यातले नाहीच असा पवित्रा वनविभागाने दिवसभर घेतला होता. स्टॉलधारकांनी स्टॉलसाठी लावलेले बांबूही दरीत फेकून देण्यात आले होते. वनविभागाने रितसर कारवाई करायची सोडून रात्रीच्या वेळी कारवाई केल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. सोमवारी वनविभागाच्या कार्यालयासमोर आंबोलीतील ग्रामस्थ केशव जाधव यांनी उपोषण केले होते. त्यानंतर वनविभागाने हा निर्णय घेतला होता. हे स्टॉल अनधिकृत आहेत. त्यामुळे स्टॉल हटविणारच, असा पवित्रा वनविभागाने घेतला होता. स्टॉलधारक आपले स्टॉल रात्री आठच्या सुमारास बंद करून जातात. हीच संधी साधत हे स्टॉल हटविले होते. पण मंगळवारी सकाळी स्टॉलधारकांना हे समजले. आपले स्टॉल हटविल्यामुळे स्टॉलधारक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली होती. मात्र आचारसंहिता असल्याने सर्व स्टॉलधारक आपल्या आंदोलनाची दिशा ठरवित होते. त्याचवेळी स्टॉलधारकांनी आक्रमक होत पुन्हा स्टॉल उभारण्याचा निर्णय घेतला. कोण आपले स्टॉल हटवते ते बघूया, असे म्हणत हे स्टॉल उभारले. मात्र उशिरापर्यंत वनविभागाचे कोणीही अधिकारी तेथे फिरकले नाहीत.दरम्यान, सोमवारी रात्री स्टॉल हटविले आणि मंगळवारी सायंकाळी स्टॉलधारकांनी पुन्हा स्टॉल उभारल्याने सध्या तरी हा वाद शमला असला तरी पुन्हा केव्हाही उभा राहू शकतो, असे मत आंबोलीतील अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले. तसेच शांत आंबोली नको त्या कारणांनी अशांत बनविली जात असल्याचा आरोपही स्टॉलधारक करीत आहेत.आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी होतेयसध्या आंबोलीच्या पर्यटनाची या ना त्या कारणाने वनविभाग बदनामी करीत आहे. कधी धबधबा कोणाचा यावरून वाद, तर कधी स्टॉलवरून वाद. यापूर्वी कधीही अशाप्रकारे वाद नव्हते. पण आता हे नव्याने आंबोलीत वाद उभे राहत आहेत. त्यामुळे आंबोलीच्या पर्यटनाची बदनामी करणा-या अधिका-यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.आंबोलीतील स्टॉल हटविण्याचे काम आंबोली वनविभागातील कर्मचा-यांकडून काही वरिष्ठ अधिका-यांनी करून घेतले. पण मंगळवारी ही कारवाई अंगलट येणार असे वाटल्याने अखेर सर्व स्टॉल उभारण्यास परवानगी दिली. तसेच याबाबत सर्वच अधिका-यांनी कानावर हात घेतले. अधिकारी कोणाचे दूरध्वनीही घेण्यास तयार नव्हते.कारवाई करणारसोमवारी रात्री जे स्टॉल हटविले ते वनविभागानेच हटविले आहेत. हे सर्व स्टॉल अनधिकृत होते व वनविभागाच्या जागेत होते. पर्यटनस्थळावर येणा-यांना पार्किंगचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने हे स्टॉल वनविभागाने हटविले आहेत आणि जर पुन्हा या ठिकाणी स्टॉल उभारले गेले असतील तर नियमात राहून कारवाई करण्यात येणार आहे.- संजय कदम, वनक्षेत्रपाल, आंबोली