शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

13 लाख शेतक-यांची कर्जमाफीसाठी नोंदणी, बुलडाण्यात सर्वाधिक 3.42 लाख भरले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 17:18 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विभागात शुक्रवारपर्यंत १३ लाख ५८ हजार ७६८ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली

अमरावती, दि. 10 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. विभागात शुक्रवारपर्यंत १३ लाख ५८ हजार ७६८ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे, तर ११ लाख ३६ हजार ९९४ शेतक-यांनी अर्ज भरले आहेत. या आठवड्यात आपले सरकार या पोर्टलसाठी सर्व्हरचा वेग वाढला असल्याने अर्जांची संख्यावाढ झाली आहे.योजनेची १५ सप्टेंबर 'डेडलाइन' आहे. मात्र या अवधीत सर्व पात्र शेतक-यांचे अर्ज भरणे शक्य नाही. तसेच ग्रामीण भागात व मेळघाटात इंटरनेटची समस्या असल्याने या योजनेला किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ द्यावी, अशी शेतक-यांची मागणी आहे. शासनाने १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ या कालावधीत दीड लाखापर्यंत थकबाकीदार शेतक-यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०१६ अखेर वाटप कर्जापैकी ३० जून २०१६ पर्यंत किंवा नंतर झालेल्या पुनर्गठनापैकी ३१ जुलै २०१७ पर्यंत वसूल न झालेले थकीत व उर्वरित हप्ते यांचा समावेश आहे.सुरुवातीपासूनच या योजनेचे सर्व्हर डाऊन, नेट कनेक्टिव्हिटी नाही. बायोमेट्रिक डिव्हाइस कनेक्ट न होने, शेतक-यांना केंद्रचालकांचे असहकार्य, आॅनलाइन अर्जासाठी शेतक-यांकडून पैसे उकळणे आदी समस्यांमध्ये कर्जमाफीची आॅनलाइन प्रक्रिया रखडली होती. आता जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने घेतल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.११ लाख शेतक-यांनी भरले आॅनलाइन अर्जअमरावती विभागात १३ लाख ५८ हजार ७६८ शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली, तर ११ लाख ३६ हजार ९९४ शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. यामध्ये सर्वाधिक ३,८३,४५७ शेतक-यांची नोंदणी बुलडाणा जिल्ह्यात झाली व ३,४२,५३४ अर्ज भरले आहेत. अकोला जिल्ह्यात १,८६,३९७ नोंदणी व १,५४,६४८ अर्ज भरले आहेत. अमरावती जिल्ह्यात २,४२,४८३, शेतक-यांची नोंदणी व १,९७,२३८ अर्ज भरले आहे. वाशिम जिल्ह्यात १,९५,५०६ शेतक-यांची नोंदणी व १,६३,१३६ अर्ज भरले आहे. यवतमाळ जिल्ह्यात ३,५०,९२५ शेतक-यांची नोंदणी व २,७९,४३८ शेतक-यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.