शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राज्यातील ५९ हजार २६३ धर्मादाय संस्थांची नोंदणी रद्द, धर्मादाय आयुक्तालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 03:59 IST

अकार्यरत धर्मादाय संस्थांवर कारवाईचा बडगा धर्मादाय आयुक्तालयाने उगारल्यामुळे, राज्यभरातील जवळपास ६० हजार संस्थांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या वर्षभरात राज्यभरातील ५९ हजार २६३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती धर्मादाय आयुक्तालयाने दिली. यात मुंबई शहर-उपनगरातील सुमारे ४ हजार ४९८ संस्थांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांचे हिशेबपत्रक, फेरफार अहवाल, धर्मादाय आयुक्तालयांच्या नियमांकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, लेखापत्र सादर केलेले नाहीत, अशा एक ना अनेक कारणांमुळे धर्मादाय संस्थांची कारवाई रद्द करण्यात आली आहे. 

स्नेहा मोरे मुंबई : अकार्यरत धर्मादाय संस्थांवर कारवाईचा बडगा धर्मादाय आयुक्तालयाने उगारल्यामुळे, राज्यभरातील जवळपास ६० हजार संस्थांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या वर्षभरात राज्यभरातील ५९ हजार २६३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची माहिती धर्मादाय आयुक्तालयाने दिली. यात मुंबई शहर-उपनगरातील सुमारे ४ हजार ४९८ संस्थांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांचे हिशेबपत्रक, फेरफार अहवाल, धर्मादाय आयुक्तालयांच्या नियमांकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, लेखापत्र सादर केलेले नाहीत, अशा एक ना अनेक कारणांमुळे धर्मादाय संस्थांची कारवाई रद्द करण्यात आली आहे. कोणत्याही संस्थेची मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायद्यांतर्गत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात येते. संस्थांची मान्यता रद्द करण्याचे अधिकार धर्मादाय आयुक्तांना देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. संस्थांच्या कामकाजाची तपासणी, आढावा घेण्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा अनावश्यक वेळ खर्च होतो. या संस्थांनी करावयाचा करभरणा, त्यांचे लेखे, त्यांचे नूतनीकरण हा सगळा व्याप या कार्यालयास सांभाळावा लागतो. काही संस्था ज्या उद्दिष्टांसाठी स्थापन केल्या आहेत. त्या अनेक संस्था मूळ उद्देशापासून भरकटल्याचे वारंवार आढळले आहे. परिणामी, या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.  यात नागपूर येथील सर्वाधिक संस्थांची म्हणजेच, १४ हजार ८५३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. त्या खालोखाल लातूर येथील ८ हजार ६१३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना धर्मादाय आयुक्तालयाचे आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सार्वजनिक राज्य विश्वस्त व्यवस्था अधिनियम  १९५० चे २२(३)नुसार धर्मादाय आयुक्त यांच्या निर्देशानुसार, ज्या विश्वस्त मंडळांनी सर्व माहितीची पूर्तता केलेली नसेल किंवा विश्वस्त मंडळाची निवड बेकायदेशीर झालेले असेल तसेच विश्वस्त मंडळ कोणतेही कार्य करत नसल्याचे आढळून आल्यास, त्याची नोंदणी रद्द करण्यात येते.