शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेमधील बंडाळीत ‘लोजपा’च्या संघर्षाचे प्रतिबिंब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 06:38 IST

लोकसभा अध्यक्षांनी तत्काळ त्यांना संसदीय पक्षाची मान्यता दिली. पारस यांना केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले.

शरद गुप्ता -नवी दिल्ली : शिवसेनेतील  सध्याच्या घटनाक्रमात लोक जनशक्ती पार्टीत झालेल्या विभाजनाचे प्रतिबिंब दिसत आहे. रामविलास पासवान यांच्यानंतर त्यांच्या पक्षाची जी स्थिती झाली तसे शिवसेनेचे भविष्य दिसत आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य शिंदे यांच्याकडे आहेत. तर, संघटना उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आपला गटच खरी शिवसेना असल्याचे शिंदे सांगतात. तर उद्धव ठाकरे गट आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगतात. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिंदे व काही आमदार नॉट रिचेबल झाले. सुरतमार्गे २५ ते ३० आमदार गुवाहाटीला गेले. त्यानंतर एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री त्यांना जाउन मिळाले. या संघर्षाचा एक टप्पा न्यायालयात सुरू झाला आहे. अशाच प्रकारचे चित्र रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात दिसून आले होते.

लोजपामध्ये काय घडले ?लोक जनशक्ती पार्टीचे नेतृत्व त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्याकडे आले. मात्र, गत ८ ऑक्टोबर रोजी त्यांचे काका पशुपतीनाथ पारस हे पक्षातील ६ पैकी ५ खासदारांना घेऊन वेगळे झाले. चिराग पासवान यांना त्यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षातून काढून टाकले आणि आपलाच खरा लोजपा आहे, हे सांगितले. 

लोकसभा अध्यक्षांनी तत्काळ त्यांना संसदीय पक्षाची मान्यता दिली. पारस यांना केंद्र सरकारमध्ये मंत्री करण्यात आले. निवडणूक आयोगाने लोक जनशक्ती पक्षाचे निवडणूक चिन्ह बंगला जप्त केले आणि चिराग पासवान यांच्या लोजपा रामविलास पासवान यांना हेलिकॉप्टर चिन्ह दिले. तर पारस यांच्या पक्षाला राष्ट्रीय लोक जनशक्तीचे नाव देऊन शिलाई मशीन चिन्ह मिळाले.

पुढे काय?सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यानंतरची लढाई विधानसभेत होणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबत आणखी एक लढाई होईल. जर लोजपा एक उदाहरण म्हणून पाहिले तर तसाच घटनाक्रम घडल्यास नुकसान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेच होईल, अशी चर्चा सुरू आहे.

 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे