शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

नागरिकांना प्रशासनाचा त्रास कमी व्हावा

By admin | Updated: September 9, 2014 01:16 IST

सामान्य माणसाच्या अपेक्षा खूप कमी असतात. रस्ते, पाणी, पथदिवे, साफसफाई, विविध दाखले यापुरतीच त्यांची धडपड असते. मात्र, अशा लहान कामांसाठीदेखील प्रशासनाकडून नागरिकांना त्रास होतो.

महापौर दटके यांची अपेक्षा : महापौर-उपमहापौरांचे पदग्रहणनागपूर : सामान्य माणसाच्या अपेक्षा खूप कमी असतात. रस्ते, पाणी, पथदिवे, साफसफाई, विविध दाखले यापुरतीच त्यांची धडपड असते. मात्र, अशा लहान कामांसाठीदेखील प्रशासनाकडून नागरिकांना त्रास होतो. त्यांची कामे वेळेत होत नाही. नागरिकांना होणारा हा त्रास अर्ध्यावर नेणे हे आपले ध्येय असून प्रशासन सामान्य माणसापर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न राहील, असे मत नवनियुक्त महापौर प्रवीण दटके यांनी व्यक्त केले. नवनियुक्त महापौर प्रवीण दटके व उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांचे सोमवारी सकाळी महापालिकेत आयोजित सोहळ्यात पदग्रहण झाले. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस, मावळते महापौर अनिल सोले, मावळत्या उपमहापौर जैतुनबी अंसारी, विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आयुक्त श्याम वर्धने, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे, मनसेचे नेते हेमंत गडकरी, प्रवीण बरडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, दटके यांच्या मातोश्री प्रतिभाताई, पत्नी प्रवदा यांच्यासह दटके- पोकुलवार यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी महापौर अनिल सोले म्हणाले, दटके यांच्या कडक स्वभावाविषयी अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कल्पना आहेत. मात्र, प्रवीण कठोर तेवढाच मनाने मृदू आहे. त्याच्यांत जोश आहे पण होशही आहे. त्यांच्या नेतृत्वात महापालिका एका नव्या उंचीवर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आ. देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासन व पदाधिकारी एकत्र येऊन काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत दटके यांना शुभेच्छा दिल्या. आ. कृष्णा खोपडे यांनी दटके- पोकलवार ही जोडी मेट्रो रेल्वेच्या गतीने धावेल, असा विश्वास व्यक्त केला. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे म्हणाले, महापौरांना सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. दटके यांची आजवरची वाटचाल सर्वसमावेशक राहिली आहे. त्यांनी वैयक्तिक संबंध जपले. विरोधी पक्ष आपले काम करीत राहील. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. संचालन झोन सभापती गोपाळ बोहरे यांनी केले. आभार उपनेत्या नीता ठाकरे यांनी मानले. (प्रतिनिधी)प्रभाकरराव दटके यांच्या स्मृतींना उजाळायाप्रसंगी प्रवीण दटके यांचे वडील दिवंगत प्रभाकरराव दटके यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. माजी महापौर आ. अनिल सोले म्हणाले, प्रभाकरराव आमचे नेते होते. त्यांच्या तालिमीत आम्ही घडलो. मी महापालिकेत त्यांच्या गटाचा प्रतोद होतो. कालांतराने त्यांचा मुलगा प्रवीण हा माझ्या गटाचा प्रतोद झाला. या वेळी सोले यांनी समोर बसलेल्या प्रभाकरराव यांच्या पत्नी प्रतिभाताई यांचे प्रेक्षकात जाऊन स्वागत केले. या वेळी प्रवीण यांचेही डोळे पानावले. आ. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही सर्व प्रभाकररावांमुळे घडलो. ते आमचे महापालिकेतील ‘हेडमास्तर’ होते. ते वंचितांचे नेते होते. ते शेवटच्या माणसाचा विचार करायचे. आ. कृष्णा खोपडे यांनीही आपण प्रभाकरांच्या तालमित महापालिका कशी चालवायची याचे धडे गिरविल्याचे सांगितले.