शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

गैरहजर डॉक्टरांना कमी करणार

By admin | Updated: August 18, 2015 22:16 IST

दीपक सावंत : मालवण ग्रामीण रुग्णालयाला सर्व सुविधा देण्याचे आश्वासन

मालवण : राज्यभरात विविध शासकीय रुगणालयात नियुक्ती असूनही गैरहजर तथा रजेवर असणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक, अधिकाऱ्यांची संख्या ४०० हून अधिक आहे. रुग्णालयात हजर न होणाऱ्या या वैद्यकीय अधिकारी, अधीक्षकांना पुन्हा सेवेत न घेता त्यांचे राजीनामे मंजूर करून याठिकाणी नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.राजीव गांधी जीवनदायी योजनेत जी रुग्णालये व तेथील डॉक्टर रुग्णांकडून जादा पैशांची मागणी करतील किंवा ज्या रुग्णालयान्ाां ही योजना रुग्णांना देणे परवडत नसेल त्या रुग्णालयांना जीवनदायी योजनेतूनही कमी केले जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाची माहिती जाणून घेताना येथील रिक्तपदे व समस्यांबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश पांचाळ यांनी माहिती दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, सभापती सीमा परुळेकर, नगरसेवक महेश जावकर, नायब तहसीलदार जी. के. सावंत, गटविकास अधिकारी राजेंद्र्र पराडकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ, तालुकाप्रमुख बबन शिंदे, हरी खोबरेकर, सेजल परब, नंदू गवंडी, रविकिरण आपटे, सतीश प्रभू, रश्मी परुळेकर, आदी उपस्थित होते. आरोग्यमंत्र्यांसमवेत आरोग्य विभागाचे डायरेक्टर सतीश पवार व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मालवण ग्रामीण रुग्णालयात आॅगस्ट २०१३ पासून वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण दोन वर्षे गैरहजर आहेत. २६ मंजूर पदांपैकी दहा पदे रिक्त आहेत. शिल्पा झाट्ये, वर्ग २ चे वैद्यकीय अधिकारी पद २००८ पासून रिक्त आहे. त्या गैरहजर आहेत. त्यांचा राजीनामाही मंजूर झाला नाही. त्यामुळे पद भरणे अवघड झाले आहे. त्यांचे मानधन सरू नसले, तरी रुग्णांना गैरसोय नको म्हणून सर्व पदे भरावित. एक्सरे टेक्निशियन, लिपिक यांची पदे भरण्याबाबत आरोग्यमंत्र्यांना सांगण्यात आले. या सर्व पदांबाबत जाहिराती काढून सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये सर्व पदे भरली जातील. रुग्णालयास जनरेटर, ब्लड स्टोरेज व सोनोग्राफी टेक्निशियन देण्याबाबत प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली मालवण ग्रामीण रुग्णालय इमारत सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने येथे असलेल्या जुन्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या इमारत दुरुस्ती, नवी उभारणी अडचणीची होत होती. याबाबत पर्यावरण मंत्रालयाची (एमसीझेडएमए) परवानगी मिळाली आहे.याबाबतचे पत्रही आपल्याला दिले जाईल. इमारत नूतनीकरणासाठी असलेल्या निधीतून निवासस्थानाची उभारणी करावी, असे आमदार नाईक यांनी आरोग्यमंत्र्यांच्या आदेशाने सांगितले.ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक असणारी दुसरी रुग्णवाहिका आमदार निधीतून दिली जाईल, असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.