शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

रेड्डीवरून सेनेचा हल्लाबोल

By admin | Updated: May 21, 2016 03:58 IST

लाच प्रकरणात अडकलेल्या नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांना भेट देणाऱ्या आयुक्तांविरोधात शिवसैनिकांनी वसई विरार पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली

विरार : लाच प्रकरणात अडकलेल्या नगररचना संचालक वाय. एस. रेड्डी यांना भेट देणाऱ्या आयुक्तांविरोधात शिवसैनिकांनी वसई विरार पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. रेड्डी यांच्यावर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. महापालिकेचे नगररचनाकार वाय. शिवा रेड्डी यांनी शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडेयांना लाच देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनावर मुक्त झाल्यानंतर रेड्डी आयुक्त सतीश लोखंडे यांना भेटण्यासाठी गेले होते. लोखंडे यांनीही तमा न बाळगता त्यांची भेट घेतली. एरवी नागरिकांना आठवड्यातून एकदा भेटणारे लोखंडे यांनी भ्रष्टाचारी रेड्डी यांची लगेचच भेट घेतली. ही बातमी शिवसैनिकांना कळल्यावर शिवसैनिकांनी मुख्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी गाढवाची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली होती. या आंदोलनात तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर, जिल्हा उपप्रमुख नवीन दुबे, विरार शहरप्रमुख दिलीप पिंपळे, किरण पाटील, संजय राऊत,प्रदीप पाटील,भगवान वझे, ज्योती पवार,सुनयना साळुंखे,स्वाती वर्तक यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. फादर मायकलजी यांनीही या आंदोलनाला पाठींबा देवून शिवसैनिकांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)> रेड्डी यांना भेटून कारणनसताना आयुक्त लोखंय्ऋे यांनी त्यांची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले.त्यामुळे आंदोलन करण्यात आले. रेड्डी यांच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून आयुक्त त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप धनंजय गावय्ऋे यांनी यावेळी बोलताना केला.आयुक्तांनी वाय. एस. रेड्डीची भेट घेतल्याने नाराज शिवसेनिकांनी महानगरपालिका मुख्यालया समोरील रस्ता अक्षरश: बंद पाडला होता. या भेटीचा निषेध करुन जाब विचारण्यासाठी काढलेल्या मोर्चामध्ये गाढवावर निषेधाचे होर्डिंग्स लावून अनोख्या पद्धतीने आपला विरोध प्रदर्शित केला.