शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भरती ऑनलाइन परीक्षा ‘सीईटी सेल’कडे देणार?; मंत्रालय पातळीवर चाचपणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 11:05 IST

खासगी कंपन्यांची गरज काय?; ‘लोकमत’च्या बातमीनंतर चाचपणी सुरू

दीपक भातुसेमुंबई : शासकीय नोकर भरतीच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या खासगी कंपन्या सक्षम नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर मंत्रालयीन पातळीवर याबाबतच्या पर्यायांवर चाचपणी सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या ‘सीईटी सेल’मार्फत दरवर्षी लाखो विद्यार्थ्यांच्या यशस्वी ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे भरती परीक्षाही या सीईटी सेलमार्फत घेतल्या जाऊ शकतात.

मागील आठवड्यात १० जानेवारीला ‘नियुक्त कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमताच नाही’ या शीर्षकाची बातमी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. या बातमीवर त्याच दिवशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली व पर्याय शोधण्याच्या किंवा नियुक्त कंपन्यांना मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. 

‘सीईटी सेल’ सक्षमटीसीएस आणि आयबीपीएस कंपन्यांकडे एका दिवसात केवळ १० ते १५ हजार उमेदवारांची परीक्षा घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे या कंपन्यांना ‘सीईटी सेल’ची सेंटर्स पुरवून परीक्षा घेता येऊ शकते, का याची चाचपणी सुरू आहे. असे झाले तर ‘सीईटी सेल’ची संपूर्ण यंत्रणा या कंपन्यांना द्यावी लागेल. शासनाने यंत्रणाही द्यायची आणि कंपनीला पैसेही द्यायचे, असे त्यामुळे घडू शकते. त्याऐवजी ‘सीईटी सेल’कडेच जबाबदारी दिली तर परीक्षा सुरळीत पार पडू शकतात, असा एक सूर असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

...आणि पैसाही वाचेलसीईटी सेल दरवर्षी साधारणतः १० लाख विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा सुरळीत पाडते. अर्ज भरणे, कागदपत्रांची छाननी, परीक्षा पार पाडणे हे विनाविघ्न पार पाडत असते. त्यामुळे शासकीय नोकर भरतीसाठीही ‘सीईटी सेल’चा वापर केल्यास पैसाही वाचू शकतो.