मुंबई : मोक्याच्या ठिकाणी होर्डिंग्ज लावणाऱ्या जाहितरातदारांवर निर्बंध आल्यानंतर आता अनेकांनी मेट्रो रेल्वेचा आसरा घेतला आहे़ मेट्रो रेल्वेचे मार्ग आणि स्थानकांच्या सिमेंटच्या वर्तुळाकार खांबांवर अनेक जाहिराती झळकू लागल्या आहेत़ फुकट लावल्या जाणाऱ्या या जाहिरातींमधून पालिकेला महसूल मिळवण्याचा मार्ग नगरसेवकांनी सुचविला आहे़ मेट्रो रेल्वेच्या स्थानकांवर खाजगी कंपन्यांचेच नव्हे, तर राजकीय पक्षांची पत्रके, वेडीवाकडी अश्लील चित्रे लावण्यात येत आहेत़ यामुळे शहराचे सौंदर्य विद्रूप होऊन पालिकेचा महसूलही बुडत आहे़ होर्डिंग्जवर तयार करण्यात आलेली नियमावली अद्यापही धूळखात पडली आहे़ तोपर्यंत अशा जाहिरातीतून आर्थिक फायदा करून घेण्याची मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महासभेपुढे मांडण्यात आली आहे़ त्यानुसार मेट्रो रेल्वे स्थानकांखालील आधार खांबांना वेगवेगळे रंग देऊन विविध खाजगी कंपन्यांना योग्य ती जाहिरात करण्याकरिता हे आधार खांब करार तत्त्वावर देण्यात यावेत़ ही ठरावाची सूचना महासभेत मंजूर झाल्यानंतर आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
पालिकेसाठी महसुलाचानवा पर्याय
By admin | Updated: May 5, 2015 01:59 IST