शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज
4
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
5
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
6
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
7
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
8
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
9
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
10
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
11
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
12
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
13
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
14
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
15
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
16
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
17
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
18
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
19
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
20
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती

पीककर्ज परतफेडीस १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: June 30, 2015 03:42 IST

पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली

मुंबई/ कोल्हापूर : पीककर्जाची परतफेड करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. साखर कारखान्यांकडून उसाचे पैसे मिळालेले नसल्याने जूनअखेर पीककर्जाची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारच्या व्याजसवलत योजनेपासून मुकावे लागणार होते. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी एक लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्यांना ० टक्के, तर तीन लाखांपर्यंतच्या कर्जाला दोेन टक्के व्याजाने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे; पण ही रक्कम एक वर्षाच्या आत म्हणजे जूनअखेर परतफेड केली, तरच या योजनेचा लाभ त्यांना मिळतो. गेल्या दोन वर्षांपासून साखर कारखान्यांची बिले वेळेत मिळत नसल्याने जूनअखेर कर्जाची परतफेड करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. यंदा तर उसाचे गाळप होऊन तीन महिने झाले, तरी अद्याप पैसे मिळालेले नाहीत. राज्यातील ७० टक्के शेतकरी थकीत गेला आहे. परिणामी त्याला व्याजसवलतीला मुकावे लागणार होते. त्यामुळे कर्ज परतफेडीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विकास सेवा संस्थांसह जिल्हा मध्यवर्ती बँकांनी राज्य सरकारकडे केली होती. अखेर शासनाने पीककर्ज परतफेडीची मुदत १५ आॅगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे.-----------------------------जे साखर कारखाने एफआरपीप्रमाणे बिले देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करावी व पीककर्ज परतफेडीस मुदत वाढ द्यावी. या मागणीसाठी पुणे येथे आयुक्त कार्यालयावर ‘स्वाभीमानी’ने मोर्चा काढला होता. त्याची दखल घेऊन कर्ज परतफेडीस मुदतवाढीचा निर्णय सरकारने घेतला आहे.- खासदार राजू शेट्टी----------------------------------------२०१३-१४चे राज्याचे पीक कर्जवाटप16,462 Cr.वाणिज्य बँका1,611 Cr.प्र्रादेशिक ग्रामीण बँका 13,354 Cr.राज्य बँक, जिल्हा बँक, भूविकास बँककेंद्राकडून दिले जाणारे पॅकेज येत्या चार-आठ दिवसांत कारखान्यांना मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांची पीक कर्जाची खाते भागेल.