शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

करोडोंचा खर्च अरबोंची वसुली

By admin | Updated: August 26, 2014 00:59 IST

उपराजधानीतील रस्त्यांना रुंद आणि सुंदर बनविण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केवळ ३५० कोटी रुपये खर्च करून त्यामोबदल्यात अरबो

पेट्रोल-डिझेलवर सेस वसुली : हिशेब देण्यास राज्य सरकारची टाळाटाळ नंदू पुरोहित/कमल शर्मा -नागपूरउपराजधानीतील रस्त्यांना रुंद आणि सुंदर बनविण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केवळ ३५० कोटी रुपये खर्च करून त्यामोबदल्यात अरबो रुपयांची वसुली केली आहे. मात्र राज्य सरकार हे सांगायला तयार नाही की त्यांनी आजवर किती रुपये वसूल केले आहे. एमएसआरडीसी, नागपूर महापालिका आणि नासुप्रने मिळून शहरात ३५० कोटी रुपयांच्या आयआरडीपी योजना यशस्वी केली. यावर लागलेला खर्च राज्य सरकारने टोल वसुली आणि पेट्रोल-डिझेलवर लावण्यात येणाऱ्या सेसमधून वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. एक दशकापेक्षा जास्त काळापासून नागपूरकर टोल टॅक्स अदा करीत आहे. तसेच एक लिटर पेट्रोलवर २ टक्के आणि डिझेलवर १ टक्का सेससुद्धा भरत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर लागणारा सेस पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट राज्य सरकारला देण्यात यावा, असे राज्य शासनाने निश्चित केले आहे. महापालिकेने याबाबत हिशेब मागितला तेव्हा आपल्याकडे याबाबत कुठलाच हिशेब नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. तज्ज्ञानुसार पेट्रोलवर प्रति लिटर १.६० रुपये आणि डिझेलवर ७० पैसे सेस वसूल केला जात आहे. शहरात दररोज सुमारे तीन लाख लिटर पेट्रोल आणि एक लाख लिटर डिझेल विकले जात आहे. त्यानुसार एका दिवसात सुमारे पाच लाख रुपये पेट्रोल विक्रीतूनच सेस वसूल केला जात आहे. वर्षाला १७ कोटी ७५ हजार रुपयापेक्षा अधिक आणि एक दशकाचा हिशेब लावला तर ही वसुली सुमारे १ अरब ७३ कोटी रुपयांपेक्षा अधिकही होते. राज्य सरकारला केवळ ३५० कोटी रुपये वसूल करायचे होते.म्हणजे अर्धी वसुली तर पेट्रोल विकूनच पूर्ण झाली आहे. डिझेल आणि जकातीद्वारे होत असलेली वसुली वेगळीच राहिली. आता खरी बाब तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा सरकार हिशेब देईल. खर्चावरही संशय आयआरडीपीअंतर्गत झालेल्या खर्चाबाबतही संशय आहे. महापालिकेनुसार एकूण योजना ३३०.४६ कोटी रुपयांची होती. यात ७२.६० कोटी रुपयांची कामे झाली नाही, म्हणजेच योजनेवर एकूण २५७.८६ कोटी रुपये खर्च झाले होते. दुसरीकडे टोल नाक्यांवर लागलेल्या बोर्डानुसार एमएसआरडीसीने दावा केला आहे की, रस्ते विकासावर आतापर्यंत ४३०.६० कोटी रुपये खर्च झाले आहे. तेव्हा खरे कोणाचे मानावे, हा खरा प्रश्न आहे.उत्तर देण्यास सरकारची टाळाटाळ सेस वसुलीसंबंधी राज्य सरकार मनपाला कुठलेही उत्तर द्यायला तयार नाही. मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यानुसार, त्यांनी आपल्या कार्यकाळात नगरविकास मंत्रालयाला पत्र पाठवून आजवर किती सेस वसूल करण्यात आला आहे, याची माहिती मागितली होती. परंतु सरकारने त्याचे कुठलेही उत्तर दिले नाही. मनपाने यानंतरही अनेकदा पत्रव्यवहार केला, मात्र सरकारकडून कुठलेच उत्तर आले नाही.