शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विनापावती ५० कोटींची वसुली?

By admin | Updated: May 14, 2017 22:56 IST

रायगड जिल्ह्यातील केबल आणि सेटटॉप बॉक्स घोटाळा हा सुमारे ५० कोटी रु पयांच्या घरात असण्याच्या शक्यतेने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील केबल आणि सेटटॉप बॉक्स घोटाळा हा सुमारे ५० कोटी रु पयांच्या घरात असण्याच्या शक्यतेने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे संबंधितांकडून ग्राहकांना पावतीही देण्यात येत नसल्याने वैध मापनशास्त्र विभागानेही चौकशी करावी, असेही आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे सरकारी अधिकारी आणि केबल आॅपरेटर यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.तालुक्यातील केबल सेटटॉप बॉक्स घोटाळ्याची पोलीस आणि आयकर विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय सावंत यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली होती. त्याची गंभीर दखल घेवून जिल्हा प्रशासनाने अलिबागचे तहसीलदार, अलिबागमधील संबंधित केबलचालक यांना म्हणणे सादर करण्याच्या नोटिसा नुकत्याच काढल्या आहेत. या आधी तहसीलदार अलिबाग यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे अहवाल सादर करून अलिबागमधील केबल आॅपरेटर यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन झाल्याने त्यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी शिफारस केली आहे. परंतु तहसीलदार अलिबाग यांनाच या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली आहे. अलिबागच्या तहसीलदारांनी पूर्वी केलेल्या सर्वेक्षणाबाबतचा खुलासाही जिल्हा प्रशासनाने मागितला आहे. त्यामुळे केबल घोटाळा केबल चालकांसोबत अधिकाऱ्यांनाही भोवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.केंद्र सरकारच्या द केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट १९९५ मधील तरतुदीनुसार केबल व्यवसायातील बेकायदा कृत्यांबाबत कारवाई करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी तसेच कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार हे प्राधिकृत अधिकारी असल्याने त्यांनी या घोटाळ्याप्रकरणी संबंधितांविरुध्द पोलिसांत गुन्हे दाखल करावे अशी मागणी संजय सावंत यांनी केली होती. सावंत यांना जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार परवाना नसलेल्या केबल आॅपरेटरने ग्राहकांकडून पैशांची वसुली करणे, ज्याला परवाना दिला आहे त्याने परवाना मिळण्यापूर्वी वर्षभर अगोदरच केबल ग्राहकांकडून पैसे उकळणे, सेटटॉप बॉक्ससाठी ग्राहकांना पावती न देता कोट्यवधी रु पयांची वसुली करणे, सरकारने केबल जोडणी सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पथकाने चुकीचा अहवाल देणे, असे विविध धक्कादायक प्रकार उघडकीस आले होते.ज्या डीजी केबलच्या नावे परवाना आहे ती डीजी केबल फेब्रुवारी २०१४ मध्येच बंद झाल्याचे केबलचालकानेच मान्य केले आहे. फेब्रुवारी २०१४ नंतर सीटी केबलतर्फे केबल प्रक्षेपण सुरू आहे. त्याचा परवाना केबलचालकाच्या पत्नीच्या नावाने नोंदणी केली असल्याचे सांगितले आहे, परंतु हा परवाना पहाण्यासाठी मागितला असता त्यांनी तो दिला नाही असे तहसीलदार अलिबाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे परवाना नसलेला आॅपरेटर ग्राहकांकडून वसुली करीत आहे, असे सावंत यांनी सांगितले. सेटटॉप बॉक्ससाठी व मासिक वसुलीची ग्राहकांना पावती दिली जात नाही हे देखील तहसीलदार अलिबाग यांनी अहवालात मान्य केल्याचे सावंत यांनी सांगितले. सरकारने केबल जोडणी सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पथकाने चुकीचा अहवाल देणे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी खुद्द तहसीलदारांनाच नोटीस काढल्याने सावंत यांच्या तक्र ारीतील मुद्दा खरा ठरला आहे.या प्रकरणात तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अहवालामध्ये अलिबाग येथील केबलचालक यांच्याकडे तीन हजार ११५ जोडण्या अस्तित्वात आहेत. त्यासाठी ते प्रत्येक ग्राहकाकडून दरमहा २७० रु. वसूल करतात, त्याची पावती ग्राहकांना दिली जात नाही. तसेच सेटटॉप बॉक्ससाठी सुरु वातीला ग्राहकांकडून प्रत्येकी एक हजार २०० रुपये वसूल केले. त्यानंतर प्रत्येकी एक हजार ५०० रुपये केबल ग्राहकांकडून वसूल केले. त्याचीही पावती दिली नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. केबलचालकाने दिलेला जबाब खरा मानला तरी तीन हजार ११५ जोडण्यांचे ग्राहकांकडून महिन्याला २७० रुपयांप्रमाणे आठ लाख एकेचाळीस हजार तर वर्षाला १ कोटी ९२ हजार ६०० इतकी रक्कम ग्राहकांकडून विनापावती वसूल केली जाते. त्याचप्रमाणे तीन हजार ११५ जोडण्यांचे ग्राहकांकडून सेटटॉप बॉक्ससाठी प्रत्येकी एक हजार ५०० म्हणजे ४६ लाख ७२ हजार ५०० रुपये विनापावती वसूल करण्यात आले आहेत. ही सर्व माहिती अलिबागपुरती असल्याचे सावंत यांचे म्हणणे आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर २०१५अखेर उपलब्ध माहितीनुसार २१ मल्टी सिस्टीम आॅपरेटर आहेत. त्यांच्या खाली ५८६ केबल आयोजक आहेत. त्यांच्यामार्फत एकूण १ लाख २ हजार ९७८ केबल जोडण्या आहेत. म्हणजेच केबलचालक प्रति ग्राहक २७० रु पयांप्रमाणे २ कोटी ७८ लाख ४ हजार ६० रुपये प्रत्येक महिन्याला गोळा करीत आहे. वर्षाला ३३ कोटी ३६ लाख ४८ हजार ७२९ रुपये वसूल करीत आहेत. तर आॅक्टोबर २०१५ अखेर उपलब्ध माहितीनुसार एकूण १ लाख २ हजार ९७८ ग्राहकांना सेट टॉप बॉक्स प्रति ग्राहक एक हजार ५०० वसूल केले असतील तर एकूण १५ कोटी ४४ लाख ६७ हजार इतकी रक्कम सेटटॉप बॉक्ससाठी वसूल केली गेली असण्याची शक्यता आहे. विनापावती मासिक वसुली व सेटटॉपबॉक्स असा एकूण सुमारे ५० कोटी रु पयांचा हा घोटाळा असल्याचे उघड होते, असे सावंत यांंनी सांगितले.