शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

Coronavirus :राज्यात दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंचा उच्चांक; दिवसभरात ६८ हजार ६३१ बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 05:54 IST

दिवसभरात ६८ हजार ६३१ रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कठोर निर्बंधानंतरही कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता तसूभरही कमी झालेली नाही. या उलट राज्यातील रोज दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येचा उच्चांक गाठत असल्याने कोरोनाचे संकट राक्षसाचे रुप धारण करत आहे. राज्यात रविवारी ६८ हजार ६३१ रुग्ण आणि ५०३ मृत्यूंची नोंद झाली आहे, परिणामी कोरोना बाधितांची एकूण संख्या ३८ लाख ३९ हजार ३३८ असून मृतांचा एकूण आकडा ६० हजार ४७३ झाला आहे.

सध्या राज्यात ६ लाख ७० हजार ३८८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आऱोग्य विभागाने दिली आहे. राज्यात मागील २४ तासांत ४५ हजार ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३१ लाख ६ हजार ८२८ बाधितांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ५०३ ५०३ मृत्यूंमध्ये मुंबई ५३, ठाणे १३, ठाणे मनपा ५, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा १, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ३, रायगड १७, पनवेल मनपा ४, नाशिक २, नाशिक मनपा ३, अहमदनगर ६१, अहमदनगर मनपा २७, जळगाव २४, जळगाव मनपा १६, नंदूरबार १९, पुणे ९, पुणे मनपा ३६, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ४,  कोल्हापूर १, सांगली ४, सांगली मिरज कुपवाड मनपा २, सिंधुदुर्ग २, रत्नागिरी १, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ३, जालना ४, परभणी ९, परभणी मनपा ८, लातूर १३, लातूर मनपा ६, उस्मानाबाद १२, नांदेड १३, नांदेड मनपा ११, अकोला १, अकोला मनपा ४, अमरावती २, अमरावती मनपा १, यवतमाळ १०, वाशिम ४, नागपूर ५,  रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत दिवसभरात ८ हजार ४७९ रुग्ण, तर ५३ मृत्यूराज्यासह मुंबईत कठोर नियम लावल्यानंतरही दैनंदिन रुग्णसंख्या व मृत्यूंच्या संख्येत फरक पडलेला नाही. कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता गडद होत असून, प्रशासनासमोर नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. मुंबईत रविवारी ८ हजार ४७९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाख ७९ हजार ३११वर पोहोचला आहे तर रविवारी ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १२ हजार ३४७वर पोहोचला आहे. ८,७८ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ४ लाख ७८ हजार ३९वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यात ५०१३ रुग्णांची वाढnठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे पाच हजार १३ रुग्ण रविवारी आढळले. जिल्ह्यातील रुग्णसंख्येत एक आठवड्यापासून एक हजारापेक्षा अधिक रुग्णांची घट झाली आहे. मात्र मृतांची संख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. आज जिल्ह्यात ४२ जणांचे निधन झाले. जिल्ह्यात आता चार लाख १६ हजार ३८१ रुग्णांसह मृतांची संख्या सहा हजार ९४२ नोंदवली आहे.nठाणे शहरात एक हजार ५९३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख सहा हजार ३२४ झाली आहे. या शहरात पाच मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ५५२ झाली. कल्याण-डोंबिवलीत एक हजार ४७५ रुग्णांची वाढ झाली असून पाच जणांचे मृत्यू झाले. आता एक लाख सहा हजार ३३ बाधितांसह एक हजार ३२२ मृत्यूची नोंंद करण्यात आली.nउल्हासनगरमध्ये १८० रुग्ण सापडले असून चार जणांचे मृत्यू झाले. येथील बाधितांची संख्या १७ हजार २७० झाली. भिवंडीला ७१ बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. मीरा-भाईंदरमध्ये ३३७ रुग्ण आढळले असून ११ मृत्यू आहे. अंबरनाथमध्ये १२२ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. येथे बाधित १५ हजार २८२ असून मृत्यू ३४२ झाले आहेत. बदलापूरमध्ये २२७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १६ हजार २५२ झाले आहेत. 

nमुंबईत सध्या ८७ हजार ६९८ सक्रिय रुग्ण आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ४५ दिवस इतका आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस