शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

बाष्पजल प्रक्रियेला मान्यता

By admin | Updated: March 28, 2015 00:10 IST

हापूसला दिलासा : युरोपातील निर्यातीचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : फळमाशीचे कारण देत युरोपीय देशांनी गतवर्षी आंबा निर्यातीवर बंदी घातली होती. यावर्षी अटीशर्थी ठेवत निर्यातीवरील बंदी उठवली होती. निर्यातीसाठी उष्णजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली होती. मात्र, अद्याप संशोधन पूर्ण होऊ शकले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.आंबा हे भारतातील नगदी पीक असून राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते. कोकणातील आंब्याची हापूस प्रजाती जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे. फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार, गुणवैशिष्ट्यांमुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ही प्रजाती लोकप्रिय आहे. आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी वर्तवले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या प्रजातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु, यासंबंधी तातडीने अहवाल पाठवण्यासाठी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. परंतु, सध्या अवकाळीतून वाचलेला आंबा शेतकऱ्यांनी बाजारपेठेत पाठवण्यास सुरूवात केली आहे. परंतु, उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्यास उशीर होणार असल्याने सध्या बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडे सत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याद्वारे हळुहळू तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. संबंधित प्रक्रिया वाशी येथे होत असल्यामुळे युरोपीय देशांनी त्यास मान्यता दिली आहे. वाशी मार्केटमधील ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर उष्णजलप्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात आला आहे.उष्णजलाचा अहवाल प्राप्त होईपर्यंत बाष्पजल प्रक्रिया करूनच आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे. सध्या वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. २० ते २५ हजार पेट्या दिवसाला विक्रीला येऊ लागल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत आंबा निम्मा असला तरी दर मात्र घसरलेला दिसून येत आहेत. परदेशी आंबा निर्यात वाढली तर वाशी मार्केटमध्ये दर टिकतील, असा अंदाज शेतकरी वर्तवत आहेत. (प्रतिनिधी)फळमाशीचे कारण देत घातली गेली होती आंबा निर्यातीवर बंदी. वाशी मार्केटमध्ये ४०० डझन आंबा विकत घेऊन त्यावर प्रक्रिया. विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू.तातडीने अहवाल पाठवणार.