शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना विरुद्ध बंडखोर, शक्तिप्रदर्शन सुरूच; अनेक ठिकाणी शिंदे समर्थकांचे मोर्चे, राऊतांचा पुतळा जाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 07:28 IST

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने जयसिंगपुरातील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या  बंडखोरीनंतर त्यांना समर्थन देणाऱ्या आमदारांच्या विरोधात गेली तीन दिवसांपासून शिवसैनिक आक्रमक झाले असून, सर्वत्र निषेध मोर्चे काढले जात आहेत. त्याला बंडखोरांचे समर्थकही सरसावले असून, बंडखोरीचे समर्थन करत शक्तिप्रदर्शन केले जात आहे.  नंदुरबार, धुळे व जळगाव, सिंधुदुर्गसह विदर्भातही  शिवसैनिकांतर्फे बंडखोरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ व बंडखोरांच्या निषेधार्थ शहादा व नवापूर येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले, तर नवापूर येथे आमदार एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना धुळ्यात पाय ठेवू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. तसेच सत्तार आणि एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शिवसेनेच्या वतीने मोर्चे काढण्यात आले. सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळात गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी सोमवारी आमदार अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयावर हल्ला केला. ही घटना निंदनीय असून शिवसैनिकांची ही गुंडगिरी आणि दादागिरी यापुढे खपवून घेणार नाही. वेळ पडल्यास आम्हाला जशास तशी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आमदार विनोद अग्रवाल यांनी यावेळी दिला.  

जयसिंगपुरात राज्यमंत्री यड्रावकरांविरोधात शिवसैनिकांचा हल्लाबोलआरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्याने जयसिंगपुरातील यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी यड्रावकर गटाचे कार्यकर्ते व शिवसैनिक आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. 

एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यड्रावकर यांचे छायाचित्र असलेला फलक व त्यांच्या कार्यालयाकडे जाणारा दिशादर्शक फलक शिवसैनिकांनी उखडून टाकल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. यावेळी पोलीस व शिवसैनिकांत मोठी झटापट झाली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना