शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंची पुढची चाल ओळखली; उद्धव ठाकरेंनी खेळली नवी खेळी; "पक्षाचा पैसा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 08:03 IST

शिंदे गटाची चाल ओळखून आधीच केली कार्यवाही, जागांचे रजिस्ट्रेशनही त्यांच्याच नावावर असल्याने ते कोणत्या गटात आहेत, त्यानुसार या शाखांच्या मालकीचा संघर्ष उद्भवू शकतो. 

मुंबई - पक्षाचे नाव आणि चिन्ह जाणार याची कुणकुण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांना आधीच लागली होती. शिवसेनेच्या पक्षनिधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाऊ शकतो, हे ओळखून पक्षनिधीची रक्कम अन्य बँक खात्यात वळविल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा पक्षनिधी सुमारे १५० कोटींचा असण्याची शक्यता आहे.

शिवसेना भवन ठाकरेंच्या ताब्यातशिवसेना पक्ष शिंदे गटाला मिळाला असला तरी दादरचे शिवसेना भवन हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे. शिवसेना भवनवर शिवाई ट्रस्टची मालकी आहे. या ट्रस्टवर अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे जुने-जाणते नेते ॲड. लीलाधर डाके आहेत. त्याचप्रमाणे ठाकरे कुटुंबातील सदस्यांचाही ट्रस्टमध्ये समावेश आहे. संघर्ष उद्भवणार आहे तो शिवसेना शाखांचा; कारण बहुतांश शाखा त्या विभागातील नेतृत्व म्हणजे विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार यांनी उभारलेल्या आहेत.  या जागांचे रजिस्ट्रेशनही त्यांच्याच नावावर असल्याने ते कोणत्या गटात आहेत, त्यानुसार या शाखांच्या मालकीचा संघर्ष उद्भवू शकतो. 

निवडणुकीच्या तयारीला लागाचोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत या, मी मशाल घेऊन तुमच्यासमोर येतो, असे आव्हान शिंदे गटाला देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील ७५ वर्षांत कोणत्याच पक्षावर झाला नसेल असा आघात आपल्यावर झाला आहे. आपले रक्त चेतविले गेले आहे. तेव्हा निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. शनिवारी मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो अशा घोषणा देण्यात आल्या. या गर्दीला संबोधित करण्यासाठी ठाकरे कारमधून कलानगरच्या प्रवेशद्वारावर आले. यावेळी कारच्या रूफमधून बाहेर येत ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

मातोश्रीवर बैठकमातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आमदार, खासदार तसेच पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत शिवसेनेचे सहाही खासदार उपस्थित असल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात आला. सोमवार किंवा मंगळवारी  निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना