शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही : अबू आझमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 15:55 IST

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

ठळक मुद्देआम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही.माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही

मुंबई, दि. 27 - आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. 'कोणताही सच्चा मुस्लिम वंदे मातरम्’ गाणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूतील सर्व शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांमध्ये आठवड्यातून किमान एकदा तरी वंदे मातरम् गाण्याची किंवा वाजवण्याची सक्ती केली होती. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम् म्हणण्याची परवानगी देत नाही. ‘आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम् गाणार नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका’असं अबू आझमी म्हणाले आहेत. तर एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.  ‘माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी वंदे मातरम् बोलणार नाही’ असं ते म्हणाले. ‘कोणीही कोणतीही विचारधारा कोणावर थोपवू शकत नाही. मी वंदे मातरम् म्हणणार नाही. माझा धर्म, कायदा आणि संविधान मला याची परवानगी देत नाही. माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी बोलणार नाही. विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला तरी विरोध करेन’ असं एमआयएमचे आमदार वारिस पठाण म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.

‘गळ्यावर सुरी ठेवण्याचा प्रश्नच नाही. मात्र इतकीच लाज वाटत असेल, तर स्वतः चालते व्हा. ही आमची मातृभूमी आहे. या भूमीला स्वतंत्र करणारं हे गीत आहे. त्या गीताचा आदर करण्याचा जर त्रास होत असेल, तर इथून निघून जा. ह्यांना पाकिस्तानची आठवण का येते? बांग्लादेशची आठवण का होत नाही? हे राहतात इथे, मात्र मनाने पाकिस्तानी आहेत.’अशा शब्दांमध्ये रावतेंनी पठाण यांचा समाचार घेतला. 

शाळा, कॉलेज, कार्यालयांमध्ये 'वंदे मातरम' अनिवार्य- 

मद्रास उच्च न्यायालयाने राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'बाबत एक नवा आदेश दिला आहे. सर्व शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटींमध्ये आठवड्यातून किमान एक दिवस वंदे मातरम गायला हवं असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.  वंदे मातरम गाण्यास कुणाचा काही आक्षेप असेल तर त्यासाठी सक्ती केली जाणार नाही, पण त्यासाठी वैध कारण असायला हवं असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

सोमवारी किंवा शुक्रवारी वंदे मातरम गीत गायल्यास अजून उत्तम असंही न्यायालयाने म्हटलं आहे. याशिवाय सर्व सरकारी कार्यालय, संस्था, खासगी कंपन्या आदींमध्येही महिन्यातून एकदा वंदे मातरम गायला हवं असं न्यायालयाने म्हटलं आहे. 

यापुर्वी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर 2016 रोजी जन-गण-मन या राष्ट्रगीतासंबंधी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. कोर्टाने देशभरातील सर्व सिनेमाघरांमध्ये राष्ट्रगीत वाजवणं तसंच पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवणं अनिवार्य केलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाला होता.   

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीShiv Senaशिवसेना