शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाचे पुनश्च हरी ओम; महाविद्यालयांचे कट ऑफ वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 00:44 IST

आज दुसरी गुणवत्ता यादी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली.

मुंबई : एसईबीसीच्या जागा वगळून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून आज अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर १० सप्टेंबरला जाहीर होणारी दुसरी गुणवत्ता यादी आज तब्बल तीन महिन्यांनी जाहीर होणार असून या गुणवत्ता यादीत महाविद्यालयांचे कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन अखेर एसईबीसीच्या जागा खुल्या प्रवर्गामध्ये वर्ग करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे एसईबीसीच्या उर्वरित रिक्त जागा या खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश मिळणार आहे. साहजिकच शाखानिहाय महाविद्यालयांचे कट ऑफ पहिल्या गुणवत्ता यादीपेक्षा जास्त असणार आहेत. मुंबई विभागात अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी १७ हजार ८४४ जागा उपलब्ध आहेत. मात्र पहिल्या फेरीसाठी केवळ २९२३ विद्यार्थ्यांनीच या जागांसाठी अर्ज सादर केले होते आणि त्यापैकी २७८८ जागांवर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश देण्यात आले होते, त्यांचे प्रवेश कायम राखले जाणार असून उर्वरित जागा खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. गुणवत्ता यादीत महाविद्यालयांचे कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा जरी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ एसईबीसीच्या जागांमुळे वाढणार असला तरी अनेक प्राचार्य आणि पालक यामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त करत आहेत. खुल्या वर्गात आधीच राज्य शिक्षण मंडळ व इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांमध्ये जागांसाठी 1खूप स्पर्धा असते, त्यात या जागा वाढल्याने विद्यार्थ्यांना स्पर्धेतून दिलासा मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया ते देत आहेत.  

टॅग्स :Studentविद्यार्थी