शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा निवडणूक ? काठावर पास झालेल्या आमदारांचे वाढले टेन्शन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 13:58 IST

आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे. 

मुंबई - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे दोन किंवा तीन पक्षांना सोबत येऊनच सरकार स्थापन करावे लागलणार आहे. मात्र सर्वात मोठे पक्ष ठरलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेले चर्चा फोल ठरत आहे. तर विरोधकांनी ठेवलेल्या अटी मान्य न झाल्यास राज्यात पुन्हा निवडणुकीचा धडका उडू शकतो. या संदर्भात मंत्र्यानेच संकेत दिले आहे. त्यामुळे काठावर पास झालेल्या आमदारांचे टेन्शन वाढले आहे.

पुन्हा विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून तयारीला लागण्याचे आदेश भाजपमंत्री जयकुमार रावल यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे मोठा पेच निर्माण होऊ शकतो. राज्यातील अनेक मतदार संघात बंडखोर आणि अपक्षांमुळे चुरशीच्या लढती झाल्या आहेत. त्यामुळे विजयी आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमदेवारांमध्ये केवळ 2 किंवा 5 हजार मतांचा फरक आहे. अशा स्थितीत निवडणूक पुन्हा लागल्यास, मतदान कमी होऊन पराभव होऊ शकतो, अशी भिती विजयी आमदारांमध्ये आहे. तर पराभूत उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित होत आहेत. 

आधीच प्रचारात अनेक नेत्यांनी सर्वस्व झोकून दिले आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागल्यास, आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. ही स्थिती विजयी आणि पराभूत उमेदवारांसाठी सारखीच आहे. 

दरम्यान शिवसेना-भाजप यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदावरून अडली आहे. त्यात भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही. अशा स्थितीत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. परंतु, काँग्रेसकडून देखील पवारांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर शिवसेना तयार न झाल्यास, राज्यात मध्यवधी निवडणूक होऊ शकते. परंतु, आर्थिक स्थिती आणि निवडणुकीचा भार यामुळे विद्यमान आमदारांचे 'इंडिकेटर' लागले आहेत.