शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

Karnala Bank: भ्रष्टाचारात आकंठ बुडाली; महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचे लायसन RBI ने केले रद्द  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 3:22 PM

Karnala Nagari Sahakari Bank licence cancelled: बँकेत सुमारे ६० हजार खातेधारक आणि ठेवीदार आहेत. त्यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या खाते धारकांचे पैसे परत मिळतील का, यावर आरबीआयने महत्वाची माहिती दिली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या सहकारी बँकेचे लायसन रद्द केले आहे. रायगड, पनवेल पट्ट्यात मोठे नाव असलेली आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेली कर्नाळा नागरी सहकारी बँकेवर (Karnala Nagari Sahakari Bank) आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा बँक ग्राहकांचे पैसे परत करण्याच्या परिस्थितीत नाहीय. (RBI cancels licence of Karnala Nagari Sahakari Bank, 95% of depositors to get full amount under DICGC)

कर्नाळा बँकेच्या कोट्यवधीच्या गैरव्यवहारात शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आ. विवेक पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले होते. बनावट खात्यावर कर्ज मंजुरी देऊन ती रक्कम त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या खात्यात वर्ग केली होती. त्यांच्यासह अनेका नेत्यांनी हा फंडा वापरून शेकडो कोटी उकळले आहेत. या प्रकरणी ईडीने जून महिन्यातच  विवेक पाटील यांना अटक केली होती. कर्नाळा बँकेत सुमारे ५२९ कोटींचा घोटाळा झाला. २०१८ मध्ये बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले होते. रिझर्व्ह बँकेने चौकशीसाठी अधिकारी नेमला. कर्नाळा बँक व्यवहाराबाबत चौकशीत धक्कादायक माहिती मिळाली होती. 

आरबीआयने ९ ऑगस्टच्या आदेशाने कर्नाळा बँकेचे लायसन रद्द करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जर बँकेला काम सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर त्याचा वेगळा परिणाम होईल, असे म्हटले आहे. 

ग्राहकांना पैसे मिळणार?सहकार आयुक्त आणि सहकार समित्यांचे रजिस्ट्रार, महाराष्ट्रकडे बँक बंद करणे आणि अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लायसन रद्द करताना आरबीआयने जमा केलेल्या कागदपत्रांद्वारे 95 टक्के खातेदारांना डिॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन अॅक्टनुसार (DICGC) पूर्ण रक्कम मागे दिली जाणार आहे. बँकेत सुमारे ६० हजार खातेधारक आणि ठेवीदार आहेत. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकfraudधोकेबाजीVivek Patilविवेक पाटील