शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र वायकरांच्या अडचणीत वाढ होणार? उद्धवसेनेकडून अपात्रतेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 09:42 IST

आमदारकीचा राजीनामा न देता, शिंदेसेनेत प्रवेश केल्याप्रकरणी संविधानाच्या दहाव्या सूचीनुसार वायकर यांच्याविरोधात उद्धवसेनेतर्फे अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : उद्धव ठाकरेंची साथ सोडत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या आणि मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदेसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्या आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. आमदारकीचा राजीनामा न देता, शिंदेसेनेत प्रवेश केल्याप्रकरणी संविधानाच्या दहाव्या सूचीनुसार वायकर यांच्याविरोधात उद्धवसेनेतर्फे अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना उद्धवसेनेचे नेते आणि आमदार अनिल परब म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फूट मान्य केली आहे, तसेच विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतही शिवसेनेत दोन सेना असल्याचे स्पष्ट झाले आहे. अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर निकाल दिला, तेव्हा वायकर आमच्या पक्षात होते. आजही ते उद्धवसेनेचे आमदार आहेत. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा न देता, शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे संविधानाच्या दहाव्या सूचीनुसार ते अपात्र ठरतात. त्यामुळे आम्ही वायकरांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी मला न्याय दिला’माझ्यावरचे सर्व आरोप खोटे असताना मला ईडीची नोटीस आली. मधल्या काळात मी ईडीच्या चौकशीलाही सामोरा गेलो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत. एक तर जेलमध्ये जा किंवा पक्ष सोडा, हे दोनच पर्याय होते. तणावात असताना मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यांनी माझी बाजू समजून घेत मला पाठिंबा आणि न्याय दिला. - रवींद्र वायकर

आपल्याला चुकीच्या प्रकरणात कसे गोवले गेले. दबाव असल्याने जेल किंवा पक्ष बदल हेच पर्याय होते आणि पत्नीलाही गोवल्यामुळे पर्याय नव्हता असे रवींद्र वायकर यांनी सांगितले आहे. वायकर यांच्यावर ही वेळ महाशक्तीच्या नीतीने आणली आहे. शिंदे गटाचे खा. गजानन किर्तीकर यांनीही ईडीचा गैरवापर थांबवा असे सांगितले. वायकरांनी स्वतः उघड केलेला हा प्रकार मुंबईकरांनी सहन करु नयेत. - सचिन सावंत, सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस 

टॅग्स :Ravindra Waikarरवींद्र वायकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना