शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 22:13 IST

रविवारीच वायकरांच्या मेहुण्याकडे आणि मुलीने मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यावरून गजहब झाला होता. आज त्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे.

देशात सध्या मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाने धुमाकूळ उडवून दिला आहे. यामतदारसंघात लोकसभा निवडणूक निकालाचा धुरळा काही केल्या खाली बसण्याचे नाव घेत नाहीय. शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी केवळ ४८ मतांनी विजयाची नोंद केली. त्यापूर्वीच मतमोजणीवेळी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकरांना विजयी घोषित करण्यात आले होते. या सगळ्याचा परिणाम पंधरा दिवस होत आले तरी कायम आहे. 

रविवारीच वायकरांच्या मेहुण्याकडे आणि मुलीने मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यावरून गजहब झाला होता. आज त्या वादाचा पुढचा अंक सुरु झाला आहे. या वादातून आता ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतमोजणीच्या दिवशी पोतनिस यांनी सशस्त्र पोलीस अंगरक्षकासह विनापरवानगी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला होता. ठाकरे गट वेगवेगळे आक्षेप घेत असल्याने आता वायकरांनीही यावर आक्षेप घेतला असून त्यांच्या तक्रारीवरून वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र मिळालेल्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश होता. परंतू पोतनिस यांच्याकडे तसे कोणतेही ओळखपत्र नव्हते. त्यांनी सायंकाळी ४ ते रात्री ८ असा प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत अमोल किर्तीकर देखील होते, अशी तक्रार वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. यानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

वायकरांच्या मेहुण्यावर आणि मुलीवर आक्षेप घेतलेले उमेदवार शाह यांनी हे प्रकरण उकरून काढले होते. त्यांनी तक्रारी केल्या होत्या परंतू त्याची दखल घेण्यात आली नव्हती. आता तहसीलदारांनी तक्रार दिली आहे. यात मेहुण्यावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप शाह यांनी रविवारी केला होता. वायकरांची मुलगी प्रज्ञा देखील मोबाईल वापरत होती, आम्ही तक्रार देऊनही, जबाब नोंदवूनही तिच्यावर तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचा गंभीर आरोप शाह यांनी केला आहे. याचबरोबर तक्रार आम्ही केली होती ती न नोंदविता तहसीलदारांच्या तक्रारीवरून गुन्हा कसा काय दाखल करण्यात आला? या गुन्ह्यात वायकर यांच्या मुलीचे नाव कसे काय वगळण्यात आले? पोलीस कोणाच्या दबावाखाली येऊन काम करत आहेत असे सवालही शाह यांनी केले आहेत. 

टॅग्स :Ravindra Waikarरवींद्र वायकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४