शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

रेशन दुकानदारांच्या मागण्या मान्य; संप मागे

By admin | Updated: August 11, 2016 20:33 IST

रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्या प्रशासनाने मान्य केल्याने दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. परिणामी सप्टेंबर महिन्यात वितरित होणाºया धान्याची उचल

 

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 -  रेशन दुकानदारांच्या प्रमुख मागण्या प्रशासनाने मान्य केल्याने दुकानदारांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. परिणामी सप्टेंबर महिन्यात वितरित होणाºया धान्याची उचल गुरूवारपासून सुरू केल्याचे आॅल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनने सांगितले.फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर म्हणाले की, वाहतूक रिबीटमध्ये वाढ करून धान्य व केरोसिनमध्ये वितरण करताना येणारी तूट मान्य केली आहे. वैयक्तिक नावाने पुरूष व महिला परवाने असतील, त्यांना मदतनीस म्हणून ठेवण्यासही मान्यता देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित असलेली धान्याची रक्कम तपासून दुकानदारांना परत करण्यासही शासनाने संमती दाखवलेली आहे. सन २०११ ते ११ दरम्यान केंद्र सरकारकडून मिळालेल्या मार्जीनमधील वाढ व फरकाची रक्कम आणि वाहतूक रिबीटची रक्कम हे सुद्धा जिल्हानिहाय तपासून तत्काळ देण्याची तयारी शासनाने दाखवली आहे.मुंबईतील रेशन दुकानदारांनीही संप मागे घेतल्याचे मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू यांनी सांगितले. मारू म्हणाले की, शासकीय गोदामापासून दुकानापर्यंत माल पोहचवण्यासाठी द्वारपोच योजना सुरू करावी, ही मुंबईतील दुकानदारांची प्रमुख मागणी होती. त्यावर शासनाने यापुढे हमाली, उतराई, भराई समाविष्ट करून निविदा काढल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. शिवाय येत्या अधिवेशनात अन्न महामंडळ स्थापनेबाबतही धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे शासनाने सांगितले आहे.नाहीतर महापालिका निवडणुकीत धडा शिकवू!शासनाने दिलेल्या आश्वासनांनंतर दुकानदार संघटनांनी संप मागे घेतला आहे. मात्र या संपाला मुंबई रेशन कार्ड धारक अधिकार संघटनेने पाठिंबा दिल्याचे मारू यांनी सांगितले. दुकानदारांसोबत रस्त्यावर उतरण्याची तयारी कार्डधारक संघटनेच्या अध्यक्षा वंदना माने यांनी दाखवली आहे. रेशनमधील भ्रष्टाचार दूर करून कार्डधारकांना तेल व डाळ उपलब्ध करून देण्याची मागणीमाने यांनी केली आहे. अधिवेशनापर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही, तर अन्न नागरी पुरवठा यांना पुढील निवडणुकीत घरी पाठवू. शिवाय सत्ताधारी पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीतही धडा शिकवू, असा इशारा माने यांनी दिला आहे.