शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठीचा दर जाहीर

By admin | Updated: July 7, 2017 18:29 IST

समृद्धी महामार्गावरील जमिनीला किमान 40 लाख ते 85 लाख एकरी भाव मिळणार आहे.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 7 - राज्य सरकारकडून समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठीचा दर जाहीर करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावरील जमिनीला किमान 40 लाख ते 85 लाख एकरी भाव मिळणार आहे. विशेष म्हणजे आदिवासी शेतक-यांना बागायतीसाठी दीडपट दर देण्यात येणार आहे. तत्पूर्वी राज्याच्या गतिमान विकासासाठी होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला होता. आता या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात येणार आहे. आजवर राज्यात कोणत्याही प्रकल्पाला दिला गेला नाही, एवढा आर्थिक मोबदला भूसंपादनासाठी देण्यात आला आहे.पूर्व-पश्चिम अशा या महामार्गाला राज्य वा राष्ट्रीय महामार्ग ज्या ठिकाणी दक्षिण-उत्तर छेद देतात त्या ठिकाणी टाऊनशिप उभारण्यावर राज्य रस्ते विकास महामंडळाने भर दिला आहे. या महामार्गामध्ये 24 नवनगरांची (टाऊनशिप) उभारणी करण्यात येणार असून, त्यातील 15 जागा आता निश्चित करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृषी समृद्धी केंद्रे असतील. त्यांच्या उभारणीमुळे कृषी माल काही तासांत मुंबईच्या बंदरात आणि त्यानंतर जगाच्या बाजारपेठेत पोहोचू शकेल. या 15 टाऊनशिपसंदर्भातील अधिसूचना नगरविकास विभागाचे उपसचिव संजय सावजी यांनी काढली होती. तसेच नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.या टाऊनशिपमध्ये लँडपुलिंग फॉर्म्युलाने किंवा खासगी सहभागानेही उभारणी करता येईल. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील बीड नाकझरी, बोरी, खानापूर (अंशत: क्षेत्र), मानकापूर, नागाझरी, रामपूर (अंशत: क्षेत्र) आणि रेनकापूर ही गावे टाऊनशिपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव या गावांचा समावेश असेल.

आणखी वाचा(समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध)(समृद्धी महामार्गाची गरज काय ?)(समृद्धी महामार्गासाठी मुद्रांक शुल्क माफ)

बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील गावंडळा, काबरा, साबरा, फैजलपूर आणि भूमुरा ही गावे मिळून टाऊनशिप बनेल. बाजूच्या जालना जिल्ह्यात जामवाडी, गुंडेवाडी आणि श्रीकृष्णनगर यांची एक टाऊनशिप बनणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कासगाव, सापगाव, शेलवली आणि खुटघर मिळून टाऊनशिप उभारली जाईल. याच तालुक्यात मौजे फुगळे आणि मौजे वाशाळा यांची दुसरी तर मौजे हिव आणि मौजे रास यांची तिसरी टाऊनशिप होईल.नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामध्ये वडगाव बक्षी, हळदगाव, भानुसली व सावंगी गावांमिळून टाऊनशिप होणार आहे. इतर टाऊनशिप अशा - अमरावती जिल्हा : धामणगाव तालुक्यातील दत्तापूर, जळगाव आर्वी, नारगवंडी, आसेगाव. वाशिम जिल्हा - कारंजा तालुक्यातील शाहा, वाल्हाई, भिलखेडा. मालेगाव तालुक्यातील रिधोरा, सुकांदा, वारंगी, ब्राह्मणवाडा. मंगरूळपीर तालुक्यातील वानोजा, पर. औरंगाबाद जिल्हा - वैजापूर तालुक्यातील घायगाव, जांभरगाव. याच तालुक्यातील हडस पिंपळगाव, करंजगाव, लासूरगाव, शहजतपूर. बाबतार, लाख. अहमदनगर जिल्हा - कोपरगाव, राहाता तालुक्यातील सावळी विहीर, चांदे कासारे. यातील बऱ्याच गावांची अंशत: जमीन सदर टाऊनशिपसाठी वापरण्यात येणार आहे.