शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आजपासून २५ ठिकाणी 'रास्ता रोको'; धनगर समाज आरक्षणाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 06:59 IST

चोंडी उपोषणाचा चौदावा दिवस, धनगर आरक्षणप्रश्नी राज्य, केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.

अशोक निमोणकर

जामखेड (जि. अहमदनगर ) धनगर समाज आरक्षणासाठी बुधवारपासून महाराष्ट्रात २५ ठिकाणी तसेच खंबाटकी घाटात रास्ता रोको करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय चोंडी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी घेण्यात आला. दरम्यान, उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर उपचार घेत असताना त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे मंगळवारी दुपारी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चोंडी (ता. जामखेड) येथे यशवंत सेनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे (अनुसूचित जमाती) आरक्षण मिळावे, यासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी या उपोषणाबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसात मार्ग काढू, असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. परंतु, दोन दिवसात सरकारकडून समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे बुधवार (दि. २०) पासून धनगर समाजाच्या वतीने खंबाटकी घाट व महाराष्ट्रातील २५ विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिली.

धनगर आरक्षणप्रश्नी राज्य, केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर, गोविंद नरवटे, समाधान पाटील, नितीन धायगुडे, किरण घालमे, बाळा गायके आदी उपोषणाला बसले आहेत. दांगडे यांना सलाइन दिले जात आहे. रविवारी उपोषणस्थळी राज्यभरातील धनगर समाजाचे नेते व विविध संघटना यांची बैठक घेऊन शासनाला दोन दिवस मुदत दिली होती. ही मुदत मंगळवारी संपली. उपोषणकर्ते यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले म्हणाले, सरकारने दोन दिवसात मार्ग काढला जाईल, असे सांगितले होते. पण, रात्री उशिरापर्यंत कोणताच निरोप सरकारकडून आला नाही. त्यामुळे बुधवारपासून समाजबांधव खंबाटकी घाटात रस्ता रोको व महाराष्ट्रातील २५ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. सरकार आमच्या बलिदानाची वाट पाहात आहे का? असा सवाल दोडतले यांनी केला आहे. 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षण