उल्हासनगर : हॉटेलमध्ये नोकरीला ठेवलेल्या तरुणीवर पहिल्याच दिवशी हॉटेलचालकाने बलात्कार केला. तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी राजकीय वजन वापरत असून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगरातील हॉटेलचालकाने एका तरुणीला लिपिकपदी कामाला ठेवले होते. कामाच्या पहिल्या दिवशी हॉटेलचालकाने जेवणाच्या बहाण्याने तिला ‘डॉल्फिन क्लब लॉज’च्या एका खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार दुपारी साडे तीन वाजता घडूनही पोलीस गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ करीत होते. शहरातील बहुतांश हॉटेल व लॉजवर सेक्स रॅकेट चालत आहे. अॅम्ब्रोसिया, पूनम, डॉल्फिन, चांदणी, १०० डेज आदी लॉज व हॉलेटवर पोलिसांनी धाडी टाकून सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. शहरातील ८० टक्के लॉजिंग-बोर्डिंग व हॉटेल मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. तरीही कारवाई होत नसल्याने मध्यवर्ती पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. अत्याचारीत तरुणीला मदत करण्याऐवजी पोलीस हॉटेलचालकाची तळी उचलत असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)
नोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणीवर बलात्कार
By admin | Updated: February 2, 2015 04:48 IST