शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे

By admin | Updated: January 7, 2015 02:35 IST

: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे-पाटील यांची मंगळवारी नियुक्ती केली.

अमित शहा यांनी केली नियुक्ती : गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाड्याला दहा वर्षांनी मान मुंबई : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांची मंगळवारी नियुक्ती केली. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाड्याला जवळपास १० वर्षांनी हे पद मिळाले आहे. दानवे गडकरी गटाचे नेते मानले जातात. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या गडकरी गटाला प्रदेशाध्यक्ष पद देऊन खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय दानवे हे मराठा आहेत तर फडणवीस हे ब्राह्मण. दानवे मराठवाड्यातले तर फडणवीस विदर्भातले. त्यामुळे विभाग, जात या पातळीवर देखील समतोल साधण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. मराठवाड्यात दानवे यांच्या निवडीने पंकजा मुंडे यांच्या वाढत्या नेतृत्वाला इशारा देण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दानवे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे. नवी नियुक्ती होण्यापूर्वी दानवे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. जालना लोकसभा मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. तत्पूर्वी ते दोन वेळा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मूळचे शेतकरी असलेल्या दानवे यांना गावपातळीपासून राजकारणाचा, सहकार क्षेत्राचा व समाजकारणाचा दांडगा अनुभव आहे. मंगळवारी दानवे दिवसभर दिल्लीत अनेक नेत्यांच्या गाठीभेठीत  व्यस्त होते. जे.पी. नड्डा, नितीन गडकरी यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. या पदासाठी आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र शेलार यांना मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मोकळे ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (विशेष प्रतिनिधी)दानवे यांची राजकीय कारकिर्दभारतीय जनता युवा मोर्चाचे जालना जिल्ह्णाचे अध्यक्ष हे रावसाहेब दानवे यांच्या राजकीय कारकिदीर्तील सुरुवातीचे पद होते. त्यांनी भोकरदन पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम केले. विधानसभा सदस्य व नंतर लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी शेती व ग्रामविकासाशी संबंधित संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम केले. भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे ते उपाध्यक्ष होते. २०१४ च्या ऐतिहासिक लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात ते केंद्रीय मंत्री आहेत.भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भोकरदन खरेदीविक्री संघ, विठ्ठलराव अण्णा सहकारी ग्राहक संस्था, भोकरदन, मोरेश्वर सहकारी खरेदी विक्री संघ, भोकरदन, मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, राजूर, शिवाजी शिक्षण संस्था, जालना जिल्हा दूध संघटना, विवेकानंद शिक्षण संस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्याशी ते संबंधित असून त्यापैकी बहुतेक संस्थांचे प्रमुखपद ते भूषवितात.-मुळगाव जवखेडा ता. भोकरदन जिल्हा जालना. -मूळ व्यवसाय शेती, जवखेडा मुळगावी संपूर्ण एकत्र कुटुंब.-जालना लोकसभा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला बनवला.-जनसामान्यांना जोडून ठेवणे, लोकसंग्रह मोठ्या प्रमाणात केला.-कार्यकर्त्यांचे मोहोळ आपल्या मृदू भाषा शैलीतून जमवले.-कायम समाधानी, हसतमुख व्यक्तिमत्व-पक्षाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या.-जवखेडा या गावचा भारतीय जनता पार्टी चे शाखा प्रमुख.-भारतीय जनता पार्टी भोकरदन तालुका अध्यक्ष.-भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा अध्यक्ष.-भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र.-प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र.————-लोकप्रतिनिधी म्हणून वाटचाल-ग्रामपंचायत सदस्य-पंचायत समिती सभापती,-आमदार,खासदार, केंद्रीय राज्यमंत्री.-राजकारण करतांना सामाजिक भान बाळगणारा नेता. -अडवाणींची रथयात्रा आणि दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेतून संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा -दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासात जडण घडण. -दोन वेळा आमदार, सलग चौथ्या वेळा खासदार म्हणून काम.-आत्तापर्यंतच्या २३ निवडणुकांपैकी २२ निवडणुका जिंकल्या.