पुणे : गणेशोत्सवासाठी मागितलेली एक हजार रुपये वर्गणी दिली नाही म्हणून एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एरंडवण्यातील हॉटेल चालकाला मारहाण करून हॉटेलची तोडफोड केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांवर अलंकार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.एरंडवण्यातील पटवर्धन बाग मधील सूर्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. हॉटेल चालकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पटवर्धन बाग बालमित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलमधील गिऱ्हाईकांनाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून हाकलून दिले. हॉटेलमधील खुर्च्या, कुंड्यांची तोडफोड करून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान केले. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी पार्किंगमधील दुचाकी गाड्याही ढकलून देत खाली पाडल्या.
गणेशमंडळ कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल
By admin | Updated: September 9, 2015 01:06 IST