शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
3
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
4
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
5
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
6
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
7
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
8
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
9
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
10
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
11
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
12
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
13
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
14
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
15
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
16
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
17
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
18
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
19
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
20
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

राणीबाग दर्शन महागले!

By admin | Updated: July 7, 2017 04:49 IST

राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या वादग्रस्त प्रस्तावावर महापालिकेच्या महासभेने आज शिक्कामोर्तब केले. या दरवाढीला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या वादग्रस्त प्रस्तावावर महापालिकेच्या महासभेने आज शिक्कामोर्तब केले. या दरवाढीला भाजपाचा विरोध असल्याने सभागृहात वादळी चर्चा होईल, असे अपेक्षित होते. मात्र हा प्रस्ताव सभेपुढे मंजुरीसाठी आला तरी भाजपा नगरसेवक गाफीलच राहिले. ‘पहारेकऱ्यांच्या’ या डुलकीचा  फायदा उठवत शिवसेनेने हा  प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानुसार १ आॅगस्टपासून राणीबाग व पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांना सहकुटुंब जायचे असल्यास शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. राणीबागेचे प्रवेश शुल्क १९९६ नंतर २००३ मध्ये वाढवण्यात आले. मात्र त्यानंतरही मुलांसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी पाच रुपये दर होते. पेंग्विन आणल्यानंतर राणीबागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र या प्रस्तावाला सर्वच स्तरांतून विरोध सुरू झाला. राजकीयच नव्हे तर माजी सनदी अधिकाऱ्यांनीही या दरवाढीवर आक्षेप घेतला. मात्र या प्रस्तावाला भाजपाकडून खो घातला जाण्याची दाट शक्यता असल्याने शिवसेना धास्तावली होती. दरवाढीच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या तसेच बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. शिवसेनेच्या खेळीमुळे भाजपाला हा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत रोखता आला नाही. उपसूचना मांडून हा प्रस्ताव लटकावण्याचेही भाजपाला सुचले नाही. त्यामुळे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपा आणि समाजवादी पक्षाने सभात्याग केला होता. महापालिका सभागृहात भाजपा आक्रमक भूमिका घेईल, असे बोलले जात होते. मात्र भाजपाचा विरोध फुसका बारच ठरला. भाजपाला विरोध करण्याची संधी मिळण्याआधीच शिवसेनेने राणीबाग प्रवेश शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. कधीपासून दरवाढ?महापालिका महासभेच्या मंजुरीनंतर दुसऱ्या महिन्यात म्हणजेच १ आॅगस्टपासून राणीबागेच्या शुल्कात वाढ होईल.पेंग्विन आणल्यापासून दररोज १५ ते २० हजार पर्यटक राणीबागेत येत आहेत. सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३५ हजारांपर्यंत पोहोचतो, असा पालिकेचा दावा आहे. मात्र राणीच्या बागेत फार पूर्वीपासून दररोज आठ ते दहा हजार पर्यटक येत असतात, असे सामाजिक संस्थांनी निदर्शनास आणले आहे. सभागृहात सतर्क असल्याचा दावा करणाऱ्या भाजपा नगरसेवकांना नेमकी याच प्रस्तावावेळी डुलकी लागली. हीच संधी साधून सेनेने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मात्र प्रस्तावाला विरोध करण्यास आम्ही बोलण्याची संधी मागितली होती. मात्र ती देण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिले.राणीबाग प्रवेश, पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : १०० रुपयांऐवजी ५० रुपये तीन ते १२ वयोगटातील मुलांसाठी : २५ रुपये कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १०० रुपये अतिरिक्त प्रत्येक तीन वर्षांवरील मुलांसाठी २५ रुपये शालेय विद्यार्थ्यांसाठीपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : नि:शुल्कखासगी शाळांतील तीन ते १२ वर्षांच्या विद्यार्थ्यांना सहलीसाठी : १५ रुपयेखासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहलीसाठी : २५ रुपयेसकाळी सहा ते आठपर्यंत चालण्यासाठी : मासिक १५० रुपये. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद.ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : नि:शुल्कफोटोग्राफी पेंग्विन वगळता : १०० रुपयेव्हिडीओ शूटिंग पेंग्विन वगळता : ३०० रुपयेपरदेशी पर्यटकांसाठी : १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४०० रुपये, तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २०० रुपये