राणेंचा चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात

By admin | Published: July 22, 2014 02:26 PM2014-07-22T14:26:51+5:302014-07-22T14:35:44+5:30

मुख्यमंत्री आणि पक्षाविरोधात उघडपणे नाराजीनामा मांडणारे काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भवितव्याचा फैसला आता सोनिया गांधी यांच्या दरबारी घेतला जाणार आहे.

Rane to Sonia Gandhi's court | राणेंचा चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात

राणेंचा चेंडू सोनिया गांधींच्या कोर्टात

Next

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २२ - मुख्यमंत्री आणि पक्षाविरोधात उघडपणे नाराजीनामा मांडणारे काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भवितव्याचा फैसला आता सोनिया गांधी यांच्या दरबारी घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि नारायण राणे हे तिन्ही नेते दोन दिवसांत दिल्लीत सोनिया गांधींची भेट  घेणार असून या भेटीनंतरच राणेंच्या राजीनाम्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 
सोमवारी मुख्यमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वाटेकरी व्हायची इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे नारायण राणे यांनी जाहीर केले होते. यानंतर मंगळवारी सकाळी नारायण राणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले. या बैठकीत राणे, चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. सुमारे दोन तास या तिघांची बैठक सुरु होती. राणेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न दोन्ही नेत्यांनी केले. मात्र यात त्यांना यश आले नाही. 'या बैठकीत काहीच तोडगा निघू शकला नाही. मी पक्षात व मंत्रिमंडळात राहावे अशी विनंती दोन्ही नेत्यांनी मला केली. मात्र मी मांडलेल्या मुद्यांवर स्पष्टीकरण मिळत नसल्याने राजीनाम्यावर ठाम असल्याचे नारायण राणेंनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. बैठकीत तोडगा न निघाल्याने दोन दिवसांत आम्ही तिघेही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेट घेण्यासाठी दिल्लीत जाणार आहोत असे राणेंनी स्पष्ट केले. या भेटीनंतर राणेंच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: Rane to Sonia Gandhi's court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.